गुढी पाडव्याच्या कलश यात्रेदरम्यान तणाव, मुंबईत मालाडमध्ये दोन हिंदू तरुणांना जमावाकडून मारहाण

Spread the love

गुढी पाडव्याच्या कलश यात्रेदरम्यान तणाव, मुंबईत मालाडमध्ये दोन हिंदू तरुणांना जमावाकडून मारहाण

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – महाराष्ट्रात रविवारी गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला. या गुढी पाडव्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी शोभा यात्रा निघाल्या होत्या. मालाड पूर्वेला कलश यात्रा काढण्यात आली होती. या कलश यात्रेदरम्यान दोन हिंदू तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडली. यावरुन आता हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. रविवारी संध्याकाळी पठाणवाडी मालाड पूर्वेला शोभा यात्रा निघाली होती. यावेळी दोन युवक मागे राहिले होत. दोन्ही युवक भगवा झेंडा घेऊन रिक्षाने जात होते. पठाणवाडी येथे त्यांचा एका समुदायासोबत वाद झाला. त्यांना रोखलं, मोठा जमाव जमला. त्या दोन युवकांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये कलश यात्रेत सहभागी होणाऱ्या दोन हिंदू मुलांना एका समुदायाच्या जमावाकडून मारहाण होत असल्याच दिसतय. मालाड पूर्वमध्ये हिंदू तरुणांना मारहाण झाल्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते कुरार पोलीस ठाण्यात पोहोचले.

मॉब लिचिंगचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करावी अशी त्यांची मागणी आहे. हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते मालाड पोलीस ठाण्यात दाखल झाले. कुरार पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतलीय. पण अजून कोणाला अटक झालेली नाही. पोलिसांना कारवाई करण्यासाठी दोन दिवसांची वेळ दिली आहे. अटक झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने दिलाय. सध्या कुरार पोलीस स्टेशनबाहेर मोठा बंदोबस्त करण्यात आले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, बजरंग दलाचे कार्यकर्ते कुरार पोलिस ठाण्यात पोहोचले आणि मॉब लिंचिंगचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon