दिवसा व रात्री घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना अटक; लाखो रुपयांची मालमत्ता हस्तगत, वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याची कामगिरी
मुंबई – वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाणे, मुंबई यांनी दिवसा व रात्री घरफोडी करणाऱ्या ५ सराईत आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे. याप्रकरणी एकूण ४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. गु.र.क्र. १६०/२०२५ कलम ३३१(४), ३०५ भादंवि अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपी नजिमुल हक ईसाक शेख (वय २३, मूळ पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली. त्याने दोन साथीदारांसह रात्री घरफोडी करून ९,५००/- रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्याच्याकडून ६,०००/- रुपयाची मालमत्ता हस्तगत करण्यात आली असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. दुसऱ्या गुन्ह्यात गु.र.क्र. १६३/२०२५ कलम ३३१(४), ३०५ भादंवि अन्वये दाखल गुन्ह्यात नजिमुल हक ईसाक शेख यालाच पुन्हा अटक करण्यात आली. या प्रकरणात रात्री घरफोडी करून ३,८०,०००/- रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह काही रोख रक्कम चोरी केली होती. त्याच्याकडून १,००,०००/- रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तिसऱ्या प्रकरणात गु.र.क्र. १७४/२०२५ कलम ३३१(३), ३०५ भादंवि अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपी अरबाज अली मोहसीन मलीक (वय २६, राहणार बेहरामपाडा, बांद्रा, मुंबई) याला अटक करण्यात आली. त्याने दिवसाची घरफोडी करून ६,६९,०००/- रुपयांचा ऐवज चोरी केला होता. पोलिसांनी त्याच्याकडून ४,३३,०००/- रुपयांची मालमत्ता हस्तगत केली असून उर्वरित मालमत्तेबाबत तपास सुरू आहे. तर चौथ्या प्रकरणात गु.र.क्र. १७५/२०२५ कलम ३३१(४), ३०५ भादंवि अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपी नागेश नित्या देवेंद्र (वय २२), सत्य रविचंद्र देवेंद्र (वय २४) आणि अंकित महेश गुप्ता (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी रात्री घरफोडी करून १५,०००/-रुपयांची चोरी केली होती. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
नमूद आरोपींवर मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यांत प्रत्येकी २ ते १० गुन्हे दाखल आहेत. त्यांनी बृहन्मुंबईमध्ये इतर ठिकाणीही अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचा पोलिसांना संशय असून त्याच दृष्टीने तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे पथक पुढील तपास करत आहे. सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ४, माटुंगा, मुंबई, श्रीमती रागसुधा आर, सहायक पोलीस आयुक्त, सायन विभाग, श्री. शैलेंद्र धिवर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा टीटी पोलीस ठाणे, श्री. रमेश जाधव व पोलीस निरीक्षक श्रीमती अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. सदर तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक श्री. माधवेंद्र येवले यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्यासोबत पोलीस हवालदार श्री. संपत गोसावी, श्री. रविंद्र ठाकुर, श्री. रमेश कुटे, तसेच पोलीस शिपाई श्री. विजय हनुमंते, श्री. नबीलाल बोरगावकर, श्री. शफीक शेख आणि श्री. रमेश बोरसे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.