मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने टोरोस पोंझी स्कीममधील चार्जशीट केली दाखल; १४२.५८ कोटींची फसवणूक, ८ आरोपींवर गुन्हा दाखल

Spread the love

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने टोरोस पोंझी स्कीममधील चार्जशीट केली दाखल; १४२.५८ कोटींची फसवणूक, ८ आरोपींवर गुन्हा दाखल

मुंबई – आर्थिक गुन्हे शाखा मुंबईने टोरोस पोंझी स्कीम प्रकरणात मोठी कारवाई करत विशेष एमपीआयडी सत्र न्यायालय, कक्ष क्रमांक ,७, मुंबई येथे चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात ८ आरोपींनी १४२.५८ कोटी रुपयांची फसवणूक केली असून १४,१५७ गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

प्रकरणाचा संक्षिप्त आढावा:

मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशन (गुन्हा रजि. नं. ०६/ २०२५ ) येथे नोंद झालेल्या या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा रजि. ०२/२०२५ अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपींवर ३१६(५), ३१७(२), ३१७

(४), ३१७(५), ३१८(५), ६१ बीएनएस कायदा, तसेच एमपीआयडी कायद्याच्या कलम ३, ४ आणि बीयूडीएस कायद्याच्या कलम २१, २३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोपींची मध्ये मेसर्स प्लॅटिनम हर्ण प्राय.लिमिटेड, तानिया उर्फ ताझागुल एक्सटोवा, वलेन्टानिया गणेश कुमार, सर्वेश सुर्वे, अल्पेश खारा, तौसिफ रियाज, आर्मेन अटीयन व लल्लन सिंग यांचा समावेश आहे.

टोरोस पोंझी स्कीम घोटाळा म्हणजे काय?

या पोंझी स्कीमअंतर्गत आरोपींनी गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र, कालांतराने ही स्कीम फसवी असल्याचे स्पष्ट झाले आणि गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले. या घोटाळ्यात १४,१५७ गुंतवणूकदारांना १४२.५८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

पुढील कायदेशीर प्रक्रिया:

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने चार्जशीट दाखल केल्यानंतर आता विशेष एमपीआयडी सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. पोलिसांकडून या घोटाळ्यात आणखी कोणी सामील आहे का, याची चौकशी सुरू आहे.

गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज:

पोलीस आणि वित्तीय तज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही अशा स्कीममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तिची सखोल चौकशी करावी आणि कंपनी सेबी किंवा अन्य नियामक संस्थांमध्ये नोंदणीकृत आहे का, हे तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon