हात-पाय अन् मुंडके छाटलेल्या माऊलीच्या हत्येच खरं कारण समोर, गावातल्या समलैंगिक जोडप्याने काढला काटा
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी इथं एका १८ वर्षीय माऊली गव्हाणे या तरुणाच्या हत्येने महाराष्ट्र हादरला आहे. आरोपींनी माऊलीचे दोन्ही हात, पाय अन् मुंडके छाटले. तसेच शीर, हात, पाय हे कटरने कापून त्यानंतर त्याचे धड एका पोत्यात भरले. हे दोन्ही गाठोडे त्यामध्ये मोठे दगड भरून दानेवाडी नदीच्या बाजूला असणाऱ्या विहिरींमध्ये टाकून दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. समलैगिंक संबधांतून ही या हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. माऊली गव्हाणे याचा खून कोणत्या कारणाने करण्यात आला याचा शोध घेत असताना पोलिसांना एक महत्त्वाचा धागा सापडला. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी कसून तपास केला.दाणेवाडी गावातीलच सागर गव्हाणे या आरोपीला ताब्यात घेतलंय.एक अल्पवयीन आरोपीसुद्धा या हत्याकांडात सहभागी असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. माऊली गव्हाणेवर सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे आणि त्याच्या एका मित्राचे समलैंगिक संबंध होते. या गोष्टीची माहिती माऊली गव्हाणेला होती त्यामुळे रागाच्या भरात त्याला संपवण्याचा कट आखण्यात आला आहे. क्रूर हत्येच्या या घटनेने शिरूर, श्रीगोंदा, अहिल्यानगर हादरला आहे. अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी हा गुन्हा बेलवंडी पोलीस स्टेशनकडून काढून अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी दिला होता. खून करणारे आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. समलैगिंक संबधांची माऊली वाच्यता करेल आणि आपली बदनामी होईल या भीतीने जोडप्याने माऊलीची हत्या केली. माऊली याचा ७ मार्चला बारावीचा पेपर होता. तो पेपर देण्यासाठी त्याच्या दाणेवाडी येथील घरुन शिरूर येथे गेला होता. पेपर दिल्यानंतर परत तो घरीच आला नाही. तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर गावाजवळ असणाऱ्या एका विहिरीत त्याचा मृतदेह सापडला होता.