पुन्हा बीड हादरले! बीडमध्ये २५ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, २ दिवस डांबून जबर मारहाण; आरोपींचा शोध सुरु

Spread the love

पुन्हा बीड हादरले! बीडमध्ये २५ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, २ दिवस डांबून जबर मारहाण; आरोपींचा शोध सुरु

योगेश पांडे / वार्ताहर 

बीड – संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरून गेला होता. यानंतर बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटनांचे व्हिडिओ समोर आले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. बीडमधील आष्टी तालुक्यात एका २५ वर्षीय तरुणाला दोन दिवस एका खोलीत बंद करून जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे. मूळचा जालन्याचा २५ वर्षीय विकास बनसोडे बीडमधील आष्टी तालुक्यातील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालकाचं काम करीत होता. गेल्या चार वर्षांपासून तो इथं काम करीत होता. त्याचे भाऊसाहेब क्षीरसागर याच्या मुलीशी प्रेमप्रकरण सुरू होतं. त्या दिवशी घराच्या मागील बाजूच्या शेतात विकास आणि आपल्या मुलीला पाहून भाऊसाहेब क्षीरसागर संतापले. त्यांनी दोन दिवस विकासला डांबून ठेवलं आणि जबर मारहाण केली. त्याच्या शरीरभर व्रण दिसत आहेत. यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे..

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासच्या जालन्यातील घरी फोन केला. आणि तातडीने बीडला येण्यास सांगितलं. यावेळी बोलताना विकासची आई त्याला मारहाण करू नका अशी विनंती करीत होती. यांचं संभाषणही समोर आलं आहे. यानंतर बनसोडे कुटुंब बीडमध्ये आले. तेथील हृश्य पाहून सर्वांना धक्काच बसला. विकासचा मृतदेह रुग्णालयात पडलेला होता. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारहाणीच्या खुणा आहेत. त्याला जबर मारहाण करण्यात आली होती. यातच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon