अंबरनाथ एमआयडीसी परिसरात भूमाफियांचा हैदोस; अनधिकृत बांधकामे जोमात, स्थानिक प्रशासन कोमात

Spread the love

अंबरनाथ एमआयडीसी परिसरात भूमाफियांचा हैदोस; अनधिकृत बांधकामे जोमात, स्थानिक प्रशासन कोमात

पोलीस महानगर नेटवर्क

अंबरनाथ – एकीकडे अनधिकृत बांधकामांना न्यायालये हातोडा चालवण्याचे आदेश देत आहेत तर अंबरनाथ एमआयडीसीमध्ये मात्र अनधिकृत गाळे व सदनिकांना प्रशासन अभय देत आहे. स्थानिक प्रशासन न्यायालयाचे आदेश देखील धुडकावून लावत असल्याचे चित्र दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ एमआयडीसी परिसरात प्लॉट नं. आर.एच. – १, येथे अनधिकृतपणे वाणिज्य गाळे व सदनिका उभारून भूमाफियांनी कब्जा केला आहे. शासनाच्या जमिनीवर अनधिकृत वाणिज्य गाळे व सदनिका उभारून शासनाची व ग्राहकांची फसवणूक सुरू आहे. सध्या मर्यादित दिसणारे वाणिज्य गाळे व सदनिका यावर वेळीच कारवाई केली नाही तर भविष्यात चहुबाजूंनी अनधिकृत गाळे व सदनिका पहावयास मिळतील अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदर प्लॉटचा कब्जा करणाऱ्या भूमाफियांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५२, ५३ व ५४ नुसार कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत गाळे व सदनिका लवकरात लवकर निष्काशीत करण्याची मागणी गुन्हेगारी जगताचा पर्दाफाश करणारे दैनिक ‘पोलीस महानगर’ चे कार्यकारी संपादक व श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश संकपाळ यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व एमआयडीसी, ठाणे येथील प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon