मुंबईतील प्रभादेवी ब्रिजवर भीषण अपघात; होळीसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांना शिवनेरी बसने चिरडले, एकाचा मृत्य

Spread the love

मुंबईतील प्रभादेवी ब्रिजवर भीषण अपघात; होळीसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांना शिवनेरी बसने चिरडले, एकाचा मृत्य

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – बेधडकपणे गाडी चालवणाऱ्या शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडल्याची घटना मुंबईतील प्रभादेवी ब्रिजवर मध्यरात्री २.३० वाजता घडली.प्रणय बोडके (२९), करण शिंदे (२९) आणि दुर्वेश गोरडे हे तिघेजण स्कुटर वरून परेल वरून दादरला होळीसाठी फुले आणण्यास चालले होते. समोरून शिवनेरी बस चालक ब्रिजवरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने आला आणि त्याने तिघांना चिरडले.सदर घटनेत प्रणय बोडके याचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुर्वेश आणि करण गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.इकबाल शेख असे चालकाचे नाव असून तो एमएसआरटीसी ची निळ्या रंगाची बस एमएच १२ व्हीएफ ३३०५ चालवत होता. चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना उपस्थित लोकांनी त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon