नेरुळमधील लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, उत्तेजक द्रव्य घेतल्यानं मृत्यू झाल्याचा संशय
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई – नवी मुंबई परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरवणे गावातील न्यू मिनी महल लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. सदर महिलेने अति प्रमाणात उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्यानं या महिलेचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. नेरुळ पोलीस ठाणे हद्दीतील शिरवणे गावात असणाऱ्या न्यू मिनी महल या लॉजमध्ये एक जोडपं रात्रीच्या सुमारास आलं होतं. सकाळच्या वेळेस लॉज मधील कर्मचाऱ्यांना संशयास्पद वाटल्याने दरवाजा उघडला असता, सदर महिलेचा मृतदेह आढळून आल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. महिलेने उत्तेजक द्रव्याचे अति प्रमाणात सेवन केल्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील शिरवणे गावात धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील न्यू मिनी महल लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. अति प्रमाणात उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्यानं हा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.