अभिनेता गोविंदा देणार पत्नी सुनीताला घटस्फोट, ३७ वर्षांचा संसार मोडणार?
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता गोविंदा चित्रपटांसह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सध्या गोविंदच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसून दोघे लवकरच एकमेकांसपासून वेगळं होणार आहेत. दोघांनी आपलं ३७ वर्षांचं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने काही मुलाखती दिल्या होत्या. यात सुनीताने गोविंदाबाबत अनेक खुलासे केले, जे ऐकून फॅन्स सुद्धा हैराण झाले होते. त्यानंतर आता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्पोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने मोठा खुलासा केला होता की ती आणि गोविंदा सध्या एकत्र राहत नाहीत. यानंतरच लोकांनी गोविंदा आणि सुनीता यांचा घटस्फोट होणार असल्याची शंका व्यक्त केली होती. अशातच आता Reddit वर गोविंदाच्या बाबत एक पोस्ट व्हायरल होत असून यात अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीताचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले आहे. यात सांगण्यात आलं आहे की गोविंदा आणि सुनीता हे दोघे वेगवेगळे राहत आहे. सुनीता ही सध्या गोविंदाच्या बाजूच्या बंगल्यात राहत असून दोघांमधील अनेक गोष्टी जुळत नाहीत. सुनीताने गोविंदाचे अनेक अफेअर्स सुद्धा सहन केले, यासोबतच तिने गोविंदाच्या आईची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली.
गोविंदा आणि सुनीता यांनी घटस्फोटांच्या चर्चेवर अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न हे ११ मार्च १९८७ रोजी झालं होतं. यंदा दोघांच्या लग्नाला ३७ वर्ष पूर्ण होत आहेत. दोघांना यशवर्धन आणि टीना नावाची दोन मुलं आहेत. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात वयात जवळपास १० वर्षांचं अंतर आहे. गोविंदाच्या मामाचे सुनीताच्या बहिणीशी लग्न झाले होते, त्यामुळे ते दोघेही एकमेकांना ओळखत होते. गोविंदाने तन बदन या चित्रपटातून पदार्पण केले, जे सुनीताच्या मामाने बनवला होता.