तीन आफ्रिकन नागरिकांवर पोलिसांची कारवाई, १ कोटी १० लाखांचे अमली पदार्थ जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत, ११ ठिकाणी पहाटे ४ च्या सुमारास छापेमारी केली. या छापेमारीत एकूण १ कोटी १ लाख १० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. सदर कारवाई मध्ये एकूण ३५ आफ्रिकन नागरिकांची पडताळणी केली असून, ३ आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नशा मुक्त नवी मुंबई अभियाना अंतर्गत, नवी मुंबई पोलिसांनी नशेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, आयुक्तालय परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करत छापीमारी केली आहे. सदर कोंबिंग ऑपरेशन मध्ये १२५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून, तब्बल ११ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत एकूण ३५ आफ्रिकन नागरिकांची तपासणी केली असता, यातील ३ नागरिकांकडे अमली पदार्थ मिळून आले. सदरचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तर पासपोर्ट व विजा संपलेल्या एकूण ११ आफ्रिकन नागरिकांना भारत सोडून जाण्याची नोटीस पोलिसांनी दिली आहे.
राज्यातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या बांग्लादेशींना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येत आहे. नवी मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या आफ्रिकन नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजता छापा टाकत कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ११ ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी तपासणी केली. छाप्यादरम्यान पोलिसांनी ११८.४८ ग्रॅम वजनाचे कोकेन, १००.८४ ग्रॅम एमडी पावडर आणि ४३,५०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. जप्त केलेल्या पदार्थाची एकूण किंमत १ कोटी १० लाख रुपये आहे. या कारवाईत एकूण ३५ आफ्रिकन नागरिकांची चौकशी करण्यात आली आणि तीन आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली. नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर अंमली पदार्थ आढळून आलेल्या तीन आफ्रिकन नागरिकांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत उलवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच इतर जणांची चौकशी करण्यात आली असता पासपोर्ट व विजा मुदत संपलेल्या एकुण ११ आफ्रिकन नागरिकांना भारत देश सोडुन जाण्याची नोटीस पोलिसांकडून देण्यात आली.