टिळकनगर पोलिस ठाण्यात कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
रवि निषाद/मुंबई
मुंबई – टिळक नगर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस आयुक्त,दे वनार विभाग. यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पब्लिक स्कूल टिळक नगर कॉलनी या ठिकाणी एक जुलै २०२४ पासून भारतीय न्याय सहायता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या नवीन तीन कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ करण्यात आला तत्पूर्वी सदर कायद्याविषयी पोलीस अधिकारी, अंमलदार, सामान्य नागरिक व विद्यार्थी यांना ओळख व्हावी याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस सहाय्यक पोलीस आयुक्त, देवनार विभाग आबुराव सोनवणे, ऍड. हरिदास नायर, प्रमुख वक्ते ऍड. सागर गायकवाड म्हणून हजर होते. तसेच सदर कार्यशाळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, टिळक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने, डैशिंग दक्ष महिला पोलिस उपनिरीक्षक पोर्णिमा हांडे व टिळक नगर पोलीस ठाण्याचे ०७ अधिकारी व २५ अंमलदार आदी कर्मचारी उपस्थित होते. तसेच २५ नागरिक, ५० विद्यार्थी ,हे सुद्धा सदर कार्यशाळेत हजर होते. यावेळी ऍड. नायर यांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या वकिलीच्या अनुभवाच्या अनुषंगाने नवीन कायद्याच्या विषयी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले तसेच ऍड. सागर गायकवाड यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे मार्ग दर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी सुद्धा सदर कायद्याच्या अनुषंगाने खूप चांगले मार्गदर्शन केले. सदरची कार्यशाळा ११:०० वाजता चालू होऊन १३:०० वाजता समाप्त झाली. शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांनी प्रमुख वक्ते यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले व सदर कार्यशाळा संपल्याचे जाहीर केले.