डेटिंग ॲप पडले महागात; महिला बनून तरुणाची लाखोंची फसवणूक; देहरादूनमधून आरोपीस बेड्या

Spread the love

डेटिंग ॲप पडले महागात; महिला बनून तरुणाची लाखोंची फसवणूक; देहरादूनमधून आरोपीस बेड्या

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – राज्यात सायबर गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दररोज फसवणूकीच्या शेकडो घटना घडत असताना नवी मुंबईत एका तरुणाला डेटिंग अँप महागात पडल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईमध्ये डेटिंग ॲपच्या नावाखाली महिला बनून एका तरुणाची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरने येथील प्रकरण असून, आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी देहरादून येथून केली अटक केली आहे.

दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी आणि आरोपी संजय कैलासचंद मीना यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने फिर्यादीसोबत बम्बल अँप द्वारे व सोशल मीडियाद्वारे संपर्क करून प्रेमाचे नाटक करत जाळ्यात ओढले. त्यानंतर फिर्यादीकडून ३३ लाख ३७ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं समजतच फिर्यादीने नवी मुंबई सायबर क्राईम पोलीस सोबत संपर्क साधला आणि आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर सायबर पोलिसांनी तपास केला असता आरोपीला उत्तराखंड येथील देहरादूनमधून अटक केली आहे. तर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी केले आहे.

आरोपी हा मुळचा जयपूरचा राहणारा असून सध्या तो देहरादूनला राहत होता. त्याने तिथे गाडी खरेदी केली होती. ती गाडी तसेच चार फोन आणि एक मॅगबूक पोलिसांनी जप्त केली.सायबर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon