मित्रानेच केला मित्राचा घात ! चिकनसाठी पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात क्रिकेटबॅटच्या हल्यात मित्राचा मृत्यु
योगेश पांडे/वार्ताहर
नवी मुंबई – मित्रांनी चिकनची पार्टी करण्याचं ठरवलं. पण त्याच पार्टीत काही तरी भयंकर होईल याचा विचार कुणीच केला नव्हता. पण तसं झालं आणि त्या पार्टीचा पुर्ण पणे विचका झाला. पार्टीसाठी जमलेल्या मित्रां पैकी एका मित्राने चिकनसाठी पैसे दिले नाहीत. हे निमित्त झालं. त्यातून भांडणं झाली. ही भांडणं इतकी टोकाला गेली की एका मित्राने दुसऱ्या मित्रावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. हा हल्ला इतका जबरदस्त होता की त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना नवी मुंबईतल्या खारघरमध्ये घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खारघरमघ्ये बैलपाडा आदिवासी वाडी आहे. इथं एक क्रिकेटचे मैदान आहे. याच मैदानात काही मित्रांनी चिकनची पार्टी करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी सर्व जण एकत्र जमले होते. सर्व साहित्य ही आणले गेले. काही जण चिकन बनवण्याची तयारी करत होती. त्याच वेळी मन्नू दिनेश शर्मा यांने पार्टीत आलेल्या जयेश वाघे याला टोकले. जयेश नेहमी फुकटात पार्टीत येतो. चिकनसाठी लागणारे पैसे तो कधीच देत नाही असं तो बोलू लागला.
जयेश वाघे हा पनवेल महापालिकेत मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करतो. मन्नू त्याला डिवचत होता. त्यामुळे जयेश आणि मन्नूमध्ये वाद झाला. हा वाद हळूहळू वाढू लागला. दोघांनीही एकमेकांना शिवागाळ करण्यास सुरूवात केली. त्यात जयेश याने मन्नूच्या कानाखाली लगावली. दोघे ही हातापायीवर आले. दोघे ही एकमेकावर तुटून पडले. पार्टी बाजूलाच राहीली. या दोघांमधील वाद वाढत गेला. मन्नूला कानाखाली मारल्याचा राग अनावर झाला होता. याच रागाच्याभरात मन्नू याने जयेशला लाथा-बुक्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली. त्यावर तो थांबला नाही. त्याने क्रिकेटच्या लाकडी बॅटने त्याच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर हल्ला चढवला. यात जयेश हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपी मन्नू शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी अटकही केली आहे. नवी मुंबई खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या मैदानात हा सर्व प्रकार घडला. लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केल्यामुळे जयेश वाघे याचा मृत्यू झाला. मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता.