पोलीस आयुक्तांनी शाळा व महाविद्यालय परिसरात १०० मिटर अंतरावर असलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश
पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; टपर्या उखडून टाकण्याच्या सूचना
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – आयटी कंपन्या तसेच आयटी तरुण-तरुणींना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्तांनी शाळा व महाविद्यालय परिसरात १०० मिटर अंतरावर असलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या तासाभरात या टपऱ्यांवर कारवाई केली गेली. हडपसर तसेच काळेपडळ पोलिसांनी ही कारवाई केली असून, शहरात देखील आता शाळा परिसरात १०० मिटर अंतरात असलेल्या टपर्या रडारवर आल्या आहेत. त्यावरही तोडफोड कारवाई केली जाणार आहे. शाळा तसेच महाविद्यालयाच्या शंभर मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. परंतु, शहरात अनेक भागात टपऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकवेळा कारवाईचा दिखावा पालिकेकडून केला जातो. अनधिकृत म्हणून ही कारवाई केली जाते. परंतु, ठोस अशी कारवाई होत नव्हती. दरम्यान, नुकताच पोलीस आयुक्तांनी मगरपट्टा येथे आयटी कंपनी व आयटीच्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन केले. त्यांना ड्रग्जचा धोका तसेच त्याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले होते.
टपऱ्यांवरील कारवाईच्या आदेशानंतर हडपसर तसेच काळेपडळ पोलिसांनी हद्दीतील शाळा परिसरात मागील बाजूस तसेच कडवस्ती परिसरात असलेल्या शाळेच्या आवारातील तीन पान टपर्यांवर कारवाई केली. संबंधीत पान टपरी चालकांवर कोफ्ता कायद्यान्वये कारवाई केली. ही कारवाई हडपसर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर काळेपडळ पोलिसांनी मोहम्मदवाडी परिसरातील रहेजा विस्टा येथील टपर्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. शाळ परिसरात अशा टपर्या सुरू करून तेथे तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणार्यांवर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. हडपसर येथील मगपट्टासिटीत आयटी कंपन्या तसेच त्यात काम करणाऱ्या तरुण-तरुणींसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पोलीस आयुक्त प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. पुणे शहरातील बहुसंख्य शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टपर्या सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याच टपर्यावर शाळकरी मुले येरजार्या मारताना तसेच सिगारेट सारखी व्यसने करतना आढळून आले आहे. याकडे नागरिकांनी प्रश्नाद्वारे पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शाळांच्या शंभर मिटर परिसरातील अनिधिकृत टपर्या उखडून टाकण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी धडक आदेश देताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.