पहिल्या पत्नीकडे जास्त वेळ राहतो या रागाच्या भरात दुसऱ्या पत्नीने आपल्या दोन भावांसह कट रचत पतीचाच केलं खून; आरोपी पत्नी गजाआड

Spread the love

पहिल्या पत्नीकडे जास्त वेळ राहतो या रागाच्या भरात दुसऱ्या पत्नीने आपल्या दोन भावांसह कट रचत पतीचाच केलं खून; आरोपी पत्नी गजाआड

योगेश पांडे/वार्ताहर 

नाशिक – पहिल्या पत्नीकडे जास्त वेळ राहातो. तिला जास्त वेळ देतो. याचा राग दुसऱ्या पत्नीला आला. त्यातून तिने आपल्या दोन भावांसह कट रचत आपल्या पतीचाच खून केला. ही धक्कादायक घटना नाशिकच्या आडगाव इथं घडली आहे. हत्या केल्यानंतर महिलेचे भाऊ फरार झाले आहेत. तर पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. तिचा पती रस्त्या शेजारी खेळणी विकण्याचे काम करत होता.पहिल्या पत्नीकडे जास्त वेळ राहातो. शिवाय आपल्याला मुलबाळ नाही यामुळे दुसरी पत्नी त्रासली होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. नाशिकच्या आडगाव सय्यद पिंप्री रस्त्या शेजारी भावसार पवार हा खेळणी विकण्याचे काम करायचा. त्याची दोन लग्न झाली होती. पहील पत्नी गुजरातला असते. तर दुसरी पत्नी नाशिकला असते. पहिल्या पत्नीकडे तो जास्त वेळ रहात असे. त्याचा राग त्याच्या दुसऱ्या पत्नीला आला होता. शिवाय तिला मुलबाळ ही नव्हतं. ही बाब तिने आपले दोन भाऊ राज शिंदे आणि आदित शिंदे यांना सांगितले. शुक्रवारी रात्री या दोघांनी भावसार याच्याशी यावरून वाद घातला. त्यानंतर त्याला मारहाण केली. त्याच्यावर धारधार शस्त्राने वारही केले. त्यात भावसार हा जबर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

भावसार मूलचंद पवार ऊर्फ बाल्या असे मृताचे नाव आहे. संशयित पत्नी सुनीता, तिचे भाऊ राज शिंदे, आदित शिंदे हे सर्व जण आडगावच्या हिंदुस्थाननगरमध्ये राहातात. या प्रकरणी भावसार याची पहिली पत्नी निरमा पवार हीने तक्रा दिली आहे. आपल्या जवळ जास्त वेळ रहावे. आपल्याला मुलबाळ होत नाही यावरून दुसऱ्या पत्नी भावसार बरोबर दिवसभर वाद घातला होता. या वादात आरोपी सुनीताचे भाऊ राज आणि आदित हेही सहभागी झाले. दिवसभर वाद सुरू असतानाच सायंकाळी सातनंतर अचानक भावसार याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याच वेळी भावसारचे कुटुंबीय आणि नातलग धावत गेले. तेव्हा संशयित सुनीता,राज, आदित, त्यांचा नातेवाईक दीपक आणि एक अनोळखी संशयित मिळून भावसारला मारहाण करीत होते. सुनीता,आदित,दीपक आणि अनोळखी संशयिताने भावसारला धरून ठेवत राज याने धारदार चाकूने त्याच्या पोटावर, छातीवर व पाठीत वार केले. आदितने डोक्यात रॉडने हल्ला करत त्याला जखमी केले. वर्मी घाव लागल्याने भावसार रक्तबंबाळ झाला होता. त्याला त्याच अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित चौघे आरोपी फरार झाले आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon