नाशिकमध्ये नायलॉन मांजाने गळा चिरून तरुणाचा मृत्यू

Spread the love

नाशिकमध्ये नायलॉन मांजाने गळा चिरून तरुणाचा मृत्यू

योगेश पांडे/वार्ताहर 

नाशिक – संक्रातीनिमित्ताने ठिकठिकाणी पतंग उडवणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र या पतंग उडविण्यासाठी नायलॉनचा मांजा सर्रास वापरला जात असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत अनेक जण या माजांमुळे जबर जखमी झाले आहेत. आता तर या मांजाने एकाच जीव घेतला आहे. ही घटना नाशिकमधून समोर आली आहे. नाशिकमध्ये एका २३ वर्षीय तरुण सोनू किसन धोत्रे याचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू झाला आहे. हा तरुण पाथर्डी फाटा परिसरातील असल्याचं समजतं. तरुणाला आधी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्य़ात आलं होतं. त्यानंतर त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्य़ात आलं. यातच त्याचा मृत्यू झाला.

तीन महिन्यांनी १३ मे रोजी सोनूचं लग्न होतं. ड्रायव्हर व्यवसायाकरिता तो गुजरातमधील वलसाड येथे स्थायिक झाला होता. मंगळवारी संक्रांतीला सणासुधीसाठी तो नाशिकला आपल्या घरी देवळाली कॅम्प येथे आला होता. त्यांच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे तो घराचा सांभाळ करीत होता. पाहता पाहता आईच्या डोळ्यांदेखत सोनूचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon