सोमय्या कॉलेजमधील प्रवेश घोटाळ्यातील ९ आरोपी अटकेत, एकाचा शोध सुरू
५५ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ३ लाख रुपयांची वसूली, लिपिकांसह दलालांकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ
घाटकोपर हिंदी हाई स्कूलच्या लिपिकाला बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजमध्ये बनावट गुणपत्रिका आणि सोडतीच्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश दिल्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातील आरोपी लिपिकांना हाताशी धरून सोमय्या महाविद्यालयात ५५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे तपासात निसपन्न झाले आहे. कोट्याच्या नावाखाली अकरावीच्या प्रवेशावेळी कॉलेज प्रशासन आणि व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला आहे.याशिवाय, सीबीएसई, आयबी, आयसीएसई, आयजीसीएसई आणि इतर शैक्षणिक मंडळांच्या अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या आणि लोगो असलेली बनावट मार्कशीट तयार करण्यात आली होती. ही बाब सोमय्या कॉलेजच्या प्राचार्यांच्या निदर्शनास आली, त्यानंतर त्यांनी समिती नेमून चौकशी केली. २४ विद्यार्थ्यांच्या मार्कशीट बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. के.जे. सोमय्या कॉलेजमध्ये बनावट मार्कशीट आणि बनावट शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या आधारे इयत्ता ११ वीला प्रवेश देण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, अटक केलेला दलाल देवेंद्र साडे हा ज्या विद्यार्थ्यांच्या मुलांना कमी गुण मिळाल्याने प्रवेश दिला जात नव्हता, त्यांच्या पालकांशी संपर्क साधायचा आणि प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये घेऊन त्यांच्या मुलांना सोमय्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन तो देत होता. कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्याच्या नावाखाली ५० ते ५५ विद्यार्थ्यांकडून २ ते ३ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. यामध्ये आता पर्यन्त एकूण ९ आरोपी अटकेत आहेत. ज्यामध्ये घाटकोपर पश्चिमेस असलेली हिंदी हाई स्कुलचा पंडित नावाचा कारकून सामिल आहेत. अजुन एक आरोपी फरार असल्याचा सांगण्यात येत आहे. सदर गुन्हयाचा तपास टिळकनगर पोलीस करीत आहेत. या गुन्हयात अजून कुणाचा सहभाग आहे का याबाबत पोलीस कडून चौकशी करीत आहेत तसेच हे रॅकेट एकाच कॉलेजमध्ये आहे की इतर कॉलेजचाही सहभाग आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. कॉलेज प्रशासनाने यामध्ये सहभागी असलेला महेंद्र पाटील आणि अर्जुन राठोड या दोन महाविद्यालयीन लिपिकांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये असलेले इतर साथीदार कमलेश भाई, जीतू भाई आणि बाबू भाई यांच्या सोबत संगनमत करुन ही फसवणूक केली गेली आहे. या रॅकेटमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वीच्या बनावट प्रवेशांचा समावेश आहे. या प्रकारणाचा तपास परिमंडळ – ६ चे डैशिंग पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवनार विभागाचे सहायक पोलिस आयुक्त आबुराव सोनावणे व त्यांचे विशेष पथक़ातील दोन पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक, तिलक नगर पोलिसच्या गुंडा शाखेचर अधिकारी राठोड़ आणि दक्ष महिला पोलिस उपनिरीक्ष पोर्णिमा हांडे व इतर पोलिस कर्मचारी करत आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, हिंदी हाई स्कुलच्या ज्या क्लर्कला पोलिसांनी अटक केली आहे तो सर्वांचे मार्कशीट आणि अन्य कागजपत्राचा तपासणी करत होता. तो हिंदी हाई स्कुलच्या संचालकाचा निकटवर्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. डैशिंग पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहायक पोलिस आयुक्त आबुराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनामुळेच या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.