दैनिक पोलीस महानगरच्या बातमीच्या दणक्यामुळे मानखुर्दमधील तेल माफियांवर पोलिसांकडून कारवाई
रवि निषाद/प्रतिनिधी
मुंबई – पूर्व प्रादेशिक विभागा मधील मानखुर्द पोलीस हद्दीतील मंडाला येथील भंगार बाजारात सध्या तेल माफिया पूर्णत: बळजबरी करून दररोज लाखोंच्या तेलाचा काळा धंदा करत असल्याचे बोलले जात आहे. या तेल माफियांमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. जे तेल माफिया तिथे हा व्यवसाय करतात त्यांच्यावर मानखुर्द सह अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. येथे तेल माफियांसाठी काम करणाऱ्या फिरोज नावाच्या तरुणाचा ज्वलनशील पदार्थाच्या संपर्कात आल्या नंतर मृत्यू झाल्याची घटना या अगोदर घडलेली आहे. सदर घटना तेल माफियांनी दडपल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुनः तेल माफिया तिथे सक्रिय झाले होते याची कुणकुण दैनिक पोलिस महानगरच्या प्रतिनिधीना लागतात त्यांनी सदर दुष्कृत्याचे वार्तांकन केले व अन्यायाविरुद्ध नेहमीच जनतेचा बुलंद आवाज बनलेल्या दैनिक पोलीस महानगरमध्ये सदर बातमी प्रकाशित झालयावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात करून दोन तेल माफियांना अटक केल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, सोहेल, अली, राहत आणि रफिक हे मोठ्या ड्रममध्ये विषारी तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थ घेऊन येतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तेल माफियांचे गॉडफादर सोहेल अणि अली नावाचे लोक आहेत. मानखुर्द आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. चोरीचे तेल ते आपल्या कार्यकर्त्यांमार्फत उघडतात आणि नंतर ते विकतात असे एका स्थानिक नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आणि त्याना संरक्षण देण्याचे काम अली व सोहेल नावाचे लोक करतात. सदर तेल माफियांना मानखुर्द पोलिस आणि स्थानिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याने याचा फायदा घेत हे लोक स्थानिक रहिवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे पोलिसांच्या विशेष सूत्रांचे म्हणणे आहे. या तेल माफियांमुळे संपूर्ण मानखुर्द परिसरामध्ये विविध प्रकारची चर्चा सुरू आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजुन सुद्धा त्यांचा हा तेलाच्या धंदा सुरुच होता त्याची बातमी प्रकाशित होताच पोलिसांनी दोन तेल माफिया विरोधात गुन्हे नोद करून त्याना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा विरोधात पोलिसानी गुन्हे ०९/२०२५ कलम (बीएनएस) १२५,२८७,(३)५ कलमानुसार नोद करण्यात आले आहे.यात मोहम्मद मुसाहिद खान आणि राहुल भाई नावाचे दोन तेल माफियाना अटक करण्यात आली आहे. एकूण ४ लाख ३८ हजार रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या तेल माफियांच्या टोळीमधील काही प्रमुख तेल माफिया फरार आहेत. त्यांचा शोध मानखुर्द पोलीस घेत आहेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधु घोरपडे यानी केली सांगितले.