भिवंडीच्या कुरेशीनगर भागात घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, आग विझविण्याचा प्रयत्न करताना पती-पत्नी जखमी
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना घडली. घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. निजामपुर पोलिस ठाणे हद्दीत कुरेशीनगर भागात ही घटना घडली आहे. घरात पती पत्नी झोपले असताना त्या घराला आग लावून जळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पती-पत्नी जखमी झाले आहेत. पतीचे नाव आसिफ कुरेशी तर पत्नीचे नाव फरिन असे आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, फरिन आसिफ कुरेशी व पती आसिफ कुरैशी असे दोघे झोपले होते. मध्यरात्री सुमारे ३ ते ३.३०वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्ती घराच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून आग लावून फरार झाले. यावेळी हल्लेखोराने घराच्या मागील दरवाजाला बाहेरुन कडी लावली होती. आगीने पेट घेत घरात धूर जमा झाल्याने लागल्याने झोपेत असलेले दोघेही पती-पत्नी जागे झाले. त्यांनी लगेच आरडा ओरड केली. त्यांनी दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर तो दरवाजा बाहेरुन बंद असल्याने दोघांनी आरडाओरड केल्याने शेजारी जागे होऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग विझविली.
पती पत्नी हे आग विझविण्याचा प्रयत्न करताना जखमी झाले आहेत. स्थानिकांनी या दोघांनांही उपचारासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी स्थानिक निजामपूर पोलिस व फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे. दरम्यान, या परिसरात मादक पदार्थ विक्री करुन गुंडगिरी करणारे तौकिर व त्याच्या साथीदारांनी ही आग लावल्याचे बोलले जात आहे. कारण, तीन महिन्यापूर्वी तौकिर व त्याच्या साथीदारांनी आसिफ याचा मेव्हणा अनस व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घे नाहीतर संपवून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली होती. दरम्यान, आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी जखमी झालेल्या पती पत्नीने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे ३ ते ३.३०वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. अज्ञात व्यक्ती घराच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून आग लावून फरार झाले आहेत. दरम्यान, पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.