भाजचाचे वार्ड अध्यक्ष अभिनाश जाधव यांचे दुःखद निधन
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – भाजपचे प्रभाग क्र.१३१ अध्यक्ष अभिनाश महादेव राव जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण घाटकोपरमध्ये शोककळा पसरली आहे. जाधव यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे असे मत भाजपा मंडळ अध्यक्ष प्रकाश सच्चन यांनी व्यक्त केले आहे. ते आज आपल्यात नाहीत त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण घाटकोपरवासीयांतर्फे त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या परिवाराला बळ देवो अशी प्रार्थना करण्यात आली. घाटकोपर पूर्व पटेल चौकात राहणारे स्व.अभिनाश जाधव यांच्या निधनामुळे घाटकोपरमध्ये वातावरण शोकाकुल आहे. त्यांच्या या निधानामुळे येथील भाजपा कार्यकर्ते आणि त्यांच्या शुभ चिंतकानी दुःख व्यक्त केले आहे. घाटकोपर पूर्व विधानसभा महामंत्री वरिष्ठ समाजसेवक सुशील भाई गुप्ता आणि येथील भाजप मंडळ अध्यक्ष प्रकाश सच्चन, भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा घाटकोपर पूर्व आणि राणा प्रताप सिंह सुनील सिंह, घनश्याम गुप्ता, कल्लू गुप्ता, परशुराम उपाध्याय, सुरेश ठाकुर, सतीश शर्मा, प्रेम प्रकाश गुप्ता, अजीत मिश्रा, अमरदेव मिश्रा, संजय निषाद, अशोक गुप्ता आणि इतर मानवरानी दुःख व्यक्त केले आहे.