शिवाजीनगरमध्ये गाडीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून सपासप वार करून हत्या
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरात एका युवकाची गाडीचा धक्का लागला म्हणून झालेल्या वादात त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये मृत युवकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
परिमंडळ – ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल खान (३२) यांच्या गाडीचा धक्का आरोपीच्या आईला लागल्याच्या कारणावरून आपसात भांडण झाले होते. सदर घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता घडली होती. त्यात आरोपीने मयताच्या घरात घुसून प्रवेश करून चाकूने छातीवर, पोटावर, मानेवर वार करून ठार मारले आहे असे मयताची पत्नी सबीना खातुन यानी सांगितले. पोलिसांनी सबिना खातून आदिल खान वय (३२) वर्षे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद केला आहे. मयत इसमाचे नाव आदिल तालीब खान ३५ वर्ष आहे. तो शांती दूत बुद्ध विहारच्या मागे रमणमामा नगर बैगणवाडी गोवंडी इथे राहत होता. शिवाजी नगर पोलिसांनी यात आरोपी अब्दुल करीम शेख उर्फ दादू आणि मोहम्मद शरीफ अब्बास अली शेख उर्फ पापा याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपीना अटक केली आहे. ढवळे यांनी सांगितले की, या गुन्ह्याचा अधिक तपास शिवाजी नगर पोलिस करीत आहेत.