घरफोडी करून जबरदस्तीने सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीस अटक, चोरी केलेला मालमत्ता हस्तगत

Spread the love

घरफोडी करून जबरदस्तीने सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीस अटक, चोरी केलेला मालमत्ता हस्तगत

रवि निषाद/प्रतिनिधि

मुंबई – ट्रांबे पोलसांच्या हद्दीत घडलेला एका चोरीच्या घटनेमध्ये आरोपीला पोलिसांनी अटक करुन त्याच्या कडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हारून अतीक अहमद शेख (२०) वर्ष सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२/१२/२०२४ रोजी बीबीजान कासिम शेख यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरानी चोरी केली. बीबीजान कासिम शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गु.र. क्र.६१५/२०२४ कलम ३०९ (४),३३४(४) भा.न्या सं.नोंद केला. त्यानंतर अपर पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटिल आणि परिमंडळ ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवले यांचा निर्देशावरुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गंगाराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकूर आणि डॅशिंग पोलिस उपनिरीक्षक शरद नानेकर यानी तांत्रिक आणि मानवी तपास यंत्रणाचा वापर करुन आरोपीची ओळख पटवली आणि सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी हारून अतीक अहमद शेखला अटक करुन त्याच्याकडून चोरी केलेला पाच ग्राम वजनाची सोन्याची चैन ज्याची कीमत ४२००० हजार असून सदर मुद्देमाल हस्तगत केला. सदरची उत्तम कामगिरी नवनाथ ढवळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ६, स.पो.आ.राजेश बाबशेट्टी, व.पो. नि.गंगाराम वळवी आणि रात्रपाळी पर्यवेक्षक पो.नि. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहभागी पो.उप.नि.शरद नाणेकर,पो.उप.नि.मनोज ठाकूर,स.पो.उ.नि.३००१९/रमेश धुमाळ,पोलिस हवलदार ०३-०९८३/सारंग,पो.शि.०७-११५४/ प्रदीप देशमुख आणि पो.शि.१५९४७२/सुरले यानी ही उत्तम कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon