मुख्याध्यापकाचेच विद्यार्थिनीशी गैरवर्तन;ऑफीसमध्ये बोलावून नको ते चाळे, विक्रोळी पोलीसांनी मुख्याध्यापकाच्या आवळल्या मुसक्या

Spread the love

मुख्याध्यापकाचेच विद्यार्थिनीशी गैरवर्तन;ऑफीसमध्ये बोलावून नको ते चाळे, विक्रोळी पोलीसांनी मुख्याध्यापकाच्या आवळल्या मुसक्या

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचाराची केस असो की पुण्यातल्या शाळेत डान्स टीचरने विद्यार्थ्याशी केलेलं गैरवर्तन, राज्यातील लैंगिक अत्याचाराच्या नवनव्या घटना रोज उघडकीस येत आहेत. या बातम्यांनी अक्षरश: नकोसं करून टाकलंय.घरी-दारी, बाहेर घेळतान अगदी शाळतेही आपली मुलं सुरक्षित आहेत की नाही याचीच चिंता पालकांना सतत सतावत असते. हे कमी की काय म्हणून आता मुंबईतील विक्रोळी येथेही असाच भयानक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. विक्रोळीतील एका नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चक्क शाळेच्या मुख्याध्यापकानेच विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचं समोर आलं न पोलिासांनी त्या नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही अल्पवयीन असून शाळेच्या मुख्याध्यपकानेच तिच्यावर अत्याचार केला आहे. ती विद्यार्थिनी गेल्या कित्येक दिवसांपासून शाळेत जाण्यास टाळाटाळ करत होती. तिचं हे वागण पाहून पालकांना संशय आला. त्यांनी तिला विश्वासात घेऊन, तिची विचारपूस केली असता तिने जे सांगितलं, ते ऐकल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मुख्याध्यापक वारंवार तिला त्यांच्या ऑफीसमध्ये बोलवायचे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचे असा आरोप आहे. मुलीवर काय प्रसंग ओढावाला हे लक्षात येताच तिचे पालक हादरले, पण भीतीने घरात शांत न बसता त्यांनी या अत्याचाराला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्या शाळेच्या नराधम मुख्याध्यापकाला बेड्या ठोकून अटक केली. पीडित विद्यार्थिनी ही दीर्घकाळ अनुपस्थित राहिल्यानंतर शुक्रवारी शाळेत गेली आणि त्यावेचळी तिच्या गैरहजेरीबाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने मुख्याध्यापकांनी तिला आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि नंतर छळ केला, असे पोलिसांनी नमूद केले. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon