१५ हजाराची लाच घेताना जळगाव महानगरपालिकेचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

१५ हजाराची लाच घेताना जळगाव महानगरपालिकेचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव – लाच प्रकरणाने जळगाव महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे. जळगाव महानगरपालिकेचा अधिकारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. बांधकाम परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेतील नगररचना विभागाचा नगररचना सहायक मनोज समाधान वन्नेरे (३४, रा. जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडी बुद्रुक येथील तक्रारदाराने महानगरपालिकेत एकूण तीन प्रकरणे मंजुरीसाठी दिली होती. पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी वन्नेरे याने सुरुवातीला २१ हजारांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दुसऱ्या प्रकरणात महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व सहायक संचालक दिघेश तायडे यांना देण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये अशी एकूण ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. त्यात १५ हजारांची लाच स्वीकारताना मनोज वन्नेरे याला रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक किशोर पाटील, राकेश दुसाने यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, सहायक संचालकांची रात्री उशिरापर्यंत चौकशी, आयुक्तांनाही बोलावणार

मनपा आयुक्त ढेरे, सहायक संचालक तायडे यांच्यासाठी लाच मागितल्याचे लाचखोर नगररचना सहायकाने सांगितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संध्याकाळी सहायक संचालकांना चौकशीसाठी बोलावले. रात्रीपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मनपा आयुक्तांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी दिली.मात्र लाच प्रकरणाने जळगाव ढवळून निघाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon