देवनारचा आरडीसी (आरएमसी) विरोधात तक्रार, प्रदूषणामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – मनपा एम पूर्व विभागात येत असलेला देवनार आरडीसी (आरएमसी) काँक्रीट मिक्सिंग प्लांटविरोधात तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते अब्दुल रज़्ज़ाक यानी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवनार पोलिस ठाण्याच्या बाजूला आरडीसी काँक्रीट प्रा.लि.नावाची कंपनी आहे. त्यामध्ये रेती सीमेंट काँक्रीट मिक्सिंग करुन मिक्सर गाडीमध्ये ये – जा करण्यात येते. त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होत असून माणसांना श्वास घेणे कठिन होते. छोटी मुले आणि वृद्धाना ह्याचा त्रास होतो. तिथे ५० मीटरच्या आत कॉलोनी आहे आणि पोलिस स्टेशन पण जवळ आहे. त्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिकानी ह्याच्या अगोदर तक्रार केली होती. पण पोलिस मनपाचे अधिकारी आणि प्रदूषण मंडळाच्या निष्काळजीपणामुळे आरडीसी विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणून या संदर्भात समाज सेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते अब्दुल रज़्ज़ाक यानी मनपा एम पूर्व विभागात आणि सायन येथील प्रदूषण कार्यालयात आपली तक्रार देऊन संबंधित कंपनीचा संचालक विरोधात कड़क कार्यवाहीची मागणी केली आहे. त्यानी असे ही सांगतले आहे की, जर या कंपनी विरोधात कारवाई झाली नाहीत तर मी या विरोधात न्यायालयमध्ये अर्ज करून आपला लढा उभा करणार आहे.