५० लाखांची फसवणुक करणाऱ्या व्यक्तीला राबोडी पोलिसांकडून अटक
रवि निषाद/प्रतिनिधि
ठाणे – राबोडी परिसरात राहणाऱ्या एका युवकाला ४७ लाख ६९ हजार ९७६ रुपयांची फसवणूक करुन फरार असलेल्या आरोपीला ठाणे राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे येथील राबोडी पोलिसांनी वाजिदअली जावेदअली सैय्यद (४५) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी जाकिर समदअली काझी आणि त्याचा मुलगा अदनान जाकिर काझी यांच्या विरोधात जुलै २०२१ मध्ये राबोडी पोलीस ठाण्यात ४२०, ४०९, ४०६, १२० ब, ३४ तसेच ३ व ४ प्रमाणे गुन्हा नोद केला होता. सदर तक्रारीमध्ये जाकिर समद अली काझी आणि त्यांचा मुलगा अदनान काझी यानी जुन्या गाडीच्या खरीद विक्रीमध्ये ४७ लाख ६९ हजार ९७६ रूपयेची गुंतवणुक करुन वाजिदअली सैय्यदची फसवणुक केली आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून जाकिर काझी आणि त्याचा मुलगा अदनान फरार झाले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एल.आर.राठोड़ यांच्या मार्फत सुरू होता. सदर आरोपी आपले वास्तव बदली करून राहत होते. पोलिसांना एका गुप्त बातमीदारानी दिलेल्या माहितीनुसार त्या दोन्ही आरोपीची सर्व माहिती मिळाल्यानंतर तपास अधिकारी राठोड यानी जाकिरला अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.