गोवंडीत बाबरी मस्जिद विध्वंश दिनानिमित्त कुराण पठण
पोलिस महानगर नेटवर्क
मुंबई – बाबरी मशिदीच्या ३२ व्या विध्वंश दिनानिमित्त वार्षिक परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. बाबरी मशिदीच्या ३२ व्या विध्वंश दिनानिमित्त समाजसेवक इरफान दिवटे यांच्या गोवंडी शिवाजी नगर येथील कार्यालयासमोर कुराण पठण करण्यात आले. तसेच दुपारी ३.३८ वाजता अझानद्वारे बाबरी मशिदीचे स्मरण करण्यात आले. बाबरी मशीदच्या या सहादत दिना निमित्त आयोजित अझानमध्ये हजरत मुफ्ती शहीद रझा मस्जिद, हजरत मौलाना मशीद यांचे स्मरण करण्यात आले. या नमाजामध्ये एश मोहम्मद कादरी, इस्राईल शाब कारी, रिजवान कारी, किस्मत आणि इतर कही उल्मा शमिल होते. या परिसरातील मुबीन खा,हुसेन खान, अब्दुल रहमान भाई सह परिसरातील इतर वृद्ध तरुण पण उपस्थित होते. या निमित्तानी समाजसेवक इरफ़ान दिवटेच्या सर्व समर्थकानी जगातील मुस्लिमांसाठी प्रार्थना केली.