सातारा स्थानिक गुन्हे व आर्थिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत एक कोटी १६ लाख ८० हजार रुपये किंमतीचे १४६ तोळे सोन्याचे दागिने जप्त
योगेश पांडे/वार्ताहर
सातारा – सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त सहकार्याने खाजगी सावकाराकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये १४० थोडी वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत एक कोटी १६ लाख ८० हजार रुपये इतकी आहे याप्रकरणी याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपाधीक्षक आश्लेषा हुले यांनी दिली याबाबत अधिक माहिती दिली. याबाबत दोन फिर्यादी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या दोन्ही प्रकरणात विजय वसंतराव चौधरी, कल्पना विजय चौधरी, अजिंक्य अनिल चौधरी यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंर्तगत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणात फिर्यादी मनोज गणपती महापरळे यांनी आरोपीकडून वेळोवेळी एक कोटी ९२ लाख रुपये रक्कम पहिल्यांदा अडीच टक्के व्याजाने नंतर दहा टक्के व्याजाने घेतली त्या रकमेस फिर्यादी याचेकडून ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ५० लाख रुपये किमतीचा प्लॉट तारण ठेवला २०१८ ते २०२३ यादरम्यान आरोपीने आरोपीला एक कोटी ९२ लाख व व्याज एक लाख कोटी बारा लाख ७७ हजार असे तीन कोटी चार लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे रुपये दिले तरी संबंधितांनी सोन्याचे दागिने आणि प्लॉट परत दिला नाही त्यावरून फिर्यादीने सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती.
दुसऱ्या प्रकरणात मयत फिर्यादी शकुंतला अशोक शिंदे यांनी आरोपी यांचे कडून १९ लाख ९८ हजार रुपये रक्कम अडीच टक्के व्याजाने घेतली होती त्याकरिता ८१ तोळे वजनाचे दागिने गहाण ठेवले होते. फिर्यादीने आरोपीला वीस लाख ४८ हजार ९३१ रुपये देऊनही ८१ तोळे दागिने परत करण्यात आले नाहीत यावरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक आश्लेषा फुले यांनी हा तपास सुरू केला करिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि त्यांच्या पथकाची मदत घेण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून साक्षीदार यांच्याकडे सखोल तपास केला. नमूद आरोपीच्या विरोधात सबळ पुरावा प्राप्त करण्यात आला व दोन्ही गुन्ह्यातील खाजगी सावकार विजय चौधरी याच्याकडील असणारे १४६ तोळे वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात साताऱ्यातील दोन सराफांना नोटीस बजावण्यात आली आहे.