देशात लोकशाहीचे वस्त्रहरण; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे उपोषण
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला दैदिप्यमान यश मिळाले. आता या यशामागे ईव्हीएमचा हात असल्याचा दावा केला जात आहे. काही मतदारसंघांतील आकडेवारीमुळे याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी गुरुवारी पुण्यात ईव्हीएमविरोधात ३ दिवस आत्मक्लेश आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचे वस्त्रहरण झाले. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला. ईव्हीएम व पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला, असे ते म्हणालेत. आता नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. हे करूनही गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह करावा लागेल, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केली. ईव्हीएमबाबत संशय घेण्यास जागा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
महात्मा फुले वाडा येथे डॉ. आढाव यांनी गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, संदेश भंडारे या वेळी उपस्थित होते. हे उपोषण ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. डॉ. आढाव म्हणाले, की अदानींचे प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशातून त्यांना पाठिंबा दिला. या प्रकरणाची संसदेत वाच्यताही होऊ नये म्हणून जे चालले आहे ते लांछनास्पद आहे. विधानसभा निवडणुकीत सरकारी पैशाचा खुळखुळा वाजला. जनतेने या पैशाला भुलू नये. मतदानानंतर मतदानाच्या आकडेवारीमध्ये सतत बदल होतात. त्यामुळे ईव्हीएमबाबत शंका घेण्यास जागा आहे आणि ती रास्त आहे. हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केले जात आहेत. मुस्कटदाबीच्या विरोधात समाजातील जागरूक वर्गाने बोलले पाहिजे. एकटा माणूसही बोलू शकतो ही लोकशाहीची शक्ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आंदोलनस्थळी जात आढाव यांची भेट घेतली. तसेच त्यांचे विचारही जाणून घेतली