भिवंडी येथील वाराळदेवी तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यु; दोघांचे मृतदेह सापडले तर, एकाचा शोध सुरु
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – भिवंडी येथील तलावात तीन मुले बुडाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद भिवंडी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तीन मुलांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून पोलिसांकडून एकाचा शोध सुरु आहे. भिवंडीतील शांती नगर परिसरात ही मुले राहत असून त्यांचे अंदाजे वय १२ ते १३ वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, ही तिन्ही मुले बुधवारी दुपारी भिवंडी शहर हद्दीतील वराळ देवी तलावात पोहायला गेली होती. परंतु, त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे ते तिघे ही तलावात बुडाली. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहेत या पैकी दोन मुलांचे मृतदेह सापडले असून तिसऱ्या मुलाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.