हा ‘नोट जिहाद’ आहे का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर थेट निशाणा; शिंदे-पवार-फडणवीसांना सवाल

Spread the love

हा ‘नोट जिहाद’ आहे का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर थेट निशाणा; शिंदे-पवार-फडणवीसांना सवाल

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पाच कोटीचे वाटप करत असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडल्याचा दावा केला आहे. त्यानंतर राज्यातलं राजकारण आणखी तापलं आहे. त्यातून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर थेट निशाणा साधत हा नोट जिहाद आहे का? असा प्रश्न भाजपला केला आहे. पैसे बाटेंगे और जितेंगे असं काही धोरण आहे का असा सवालही ठाकरे यांनी करत भाजपला घेतलं आहे. शिवाय हे भाजपमधील अंतर्गत गँगवॉर असू शकतं असं ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावर निवडणूक आयोगालाही सुनावलं आहे. आपण तुळजाभवानीच्या दर्शनाला आलो होतो. त्यावेळीही आपली बॅग तपासण्यात आली. आमच्या बॅग तपासता मग तावडेंची बॅग कोण तपासणार असा प्रश्न त्यांनी केला. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. अशा वेळी आता निवडणूक आयोगाने तावडें विरोधात निपक्षपाती पणे कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तावडे हे तावडीत सापडले असतील तर त्यांनी या आधीची सरकारं कशी बनवली आणि कशी पाडली हे सांगितलं पाहीजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी कौतूक केले आहे. हा प्रकार म्हणजे भाजपमधल्या आपसातील गँगवॉर असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. शिंदे गटाचे पैसेही नुकतेच पकडले गेलो होते. त्यामुळे मिंदे गटाकडून तर हे केलं गेलं नाही ना असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. सगळ्या महाराष्ट्राने हे पाहीले आहे. त्यामुळे त्यांच्या योजना कशा फसव्या आहेत हे पण कळते. बहीणीला पंधराशे देता आणि बाकीच्यां नोटांची बंडलच्या बंडल देता असा आरोपही त्यांनी केला. भाजप नेहमी वोट जिहादचं बोलत आहे. मग आता हे जे काय पैसे वाटताना पकडले गेले आहेत, ते काय नोट जिहाद आहे का असा प्रश्नही त्यांनी केला आहे. एकेकडे बटेंगे तो कटेंग, एक है तो सेफ है अशा घोषणा दिल्या जात आहेत. पण या पैसे वाटपा नंतर पैसा वाटेंगे और जितेंगे असं दिसत आहे असा टोला ही ठाकरे यांनी लगावला आहे. याच तावडेंनी पैशाच्या जोरावर काही ठिकाणी सरकार पाडली आणि बनवली आहे. भाजपचा हा नोट जिहाद आहे असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon