अहिल्यानगरमध्ये राडा ! बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरक्षा रक्षकाकडून ९ काश्मिरी तरूणांना अटक; ९ रायफली आणि ५८ काडतूसांचा शस्त्रसाठा जप्त

Spread the love

अहिल्यानगरमध्ये राडा ! बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरक्षा रक्षकाकडून ९ काश्मिरी तरूणांना अटक; ९ रायफली आणि ५८ काडतूसांचा शस्त्रसाठा जप्त

योगेश पांडे/वार्ताहर 

नगर – अहिल्यानगरमधून काश्मीरमधील ९ तरूणांना अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या तरूणांकडून ९ रायफली आणि ५८ काडतूसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई लष्कराचा गुप्तचर विभाग आणि तोफखाना पोलिसांनी एकत्रितपणे केली आहे.या कारवाईनंतर पोलिसांनी आणखी शस्त्रसाठा आणि तरूण सापडण्याची शक्यता आहे.त्यामुळे पोलिसांनी शोधमोहिम सूरू केली आहे.या घटनेनंतर शहरात एकच खळबळ माजली आहे. या टोळीचा मुख्य सुत्रधार शब्बीर मोहम्मद गुज्जर याने शहरातील तारकपूर भागात मूळच्या राजौरीचा असलेल्या शेरखान यांच्याकडून २०१५ मध्ये बनावट शस्त्र परवाना व १२ बोअरवेलची रायफल खरेदी केली होती. त्यानंतर त्याने राजौरी येथील काही तरूणांना बोलावून घेतले होते. याबाबची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला होती.त्यानुसार गुप्तचर विभागाने तोफखाना पोलिसांसोबत तपास करायला सुरूवात केली होती.

या तपासादरम्यान जम्मू आणि काश्मिर राज्यातील काही व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे अहिल्यानगर शहर, आजूबाजूच्या शहरात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत असल्याची माहिती तोफखाना पोलिस आणि लष्कर गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पथकाने छापा टाकून अहिल्यानगर, श्रीगोंदा, सोनई, पुणे अशा विविध ठिकाणाहून नऊ आरोपींना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी जम्मू-काश्मिरच्या राजौरी जिल्ह्यातील आहेत. या आरोपीकडून १२ बोअरच्या नऊ रायफली, बनावट शस्त्र परवाने आणि ५८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. दरम्यान न्यायालयात या नऊ आरोपींना हजर केले असता त्यांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या कारवाईनंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली असून आणखी शस्त्रसाठा आणि संबंधित तरूण सापडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon