दिवाळीत पुणे पोलिसांची अनोखी भेट; गहाळ झालेले ३० मोबाइल फोन नागरिकांना परत

Spread the love

दिवाळीत पुणे पोलिसांची अनोखी भेट; गहाळ झालेले ३० मोबाइल फोन नागरिकांना परत

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – डेक्कन जिमखाना परिसरातून गहाळ, तसेच चोरीला गेलेल्या ३० मोबाइल संच पोलिसांनी परत मिळवले. गहाळ झालेले ३० मोबाइल संच पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. मोबाइल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. गर्दीच्या ठिकाणांहून मोबाइल संच गहाळ होणे, तसेच चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मोबाइल गहाळ झाल्यानंतर परत मिळण्याची शाश्वती नसते. मोबाइल माहिती, छायाचित्रांचा गैरवापर होऊ नये म्हणून नागरिक तक्रार देतात. मोबाइल चोरी, तसेच गहाळ झाल्याच्या तक्रारी डेक्कन पोलिसांकडे आल्या होत्या. पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाकडून मोबाइल संचांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी उमा पालवे, सरोजा देवर, सुप्रिया सोनवणे यांच्या पथकाने हरवलेल्या मोबइलची माहिती संकलित करून तांत्रिक तपास सुरू केला. हरवलेले मोबाइल संच राज्यातील वेगवेगळ्या भागात वापरात असल्याचे तांत्रिक तपासात निदर्शनास आले. त्यानुसार मोबाईलचा आयएमईआय क्रमांक आणि तांत्रिक तपास करून पोलिसांनी गहाळ झालेल्या ३० मोबाइल संचांचा शोध घेतला. गहाळ झालेले मोबाइल वापरणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधून मोबाइल संच त्वरीत डेक्कन पोलीस ठाण्यात आणून देण्याच्या सूचना दिल्या. मोबाइल संच परत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात मोबाइल संच परत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon