निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या २४ तासात ५२ कोटीची मालमत्ता जप्त

Spread the love

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या २४ तासात ५२ कोटीची मालमत्ता जप्त

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अंमलबजावणी यंत्रणाद्वारे वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्यात. त्या मध्ये बेकायदा पैस, दारु,ड्रग्ज आणि मौल्यवान धातू जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आली आहे. या कालावधीत एकूण ९० कोटी ७४ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या चोवीस तासात तब्बल ५२ कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. निवडणूक काळात कारवाई करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणाद्वारे वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहे. त्यांची करडी नजर प्रत्येक गोष्टीवर आहे. गेल्या चोवीस तासात १९ पथकांनी कारवाई करत तब्बल १९ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. पोलिसांचेही यात मोठे सहकार्य मिळाले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी नाकेबंदी केली. त्यातही ही रक्कम जप्त करण्यात आलीय. इन्कमटॅक्स डिपार्टमेंट जवळपास ३० कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. रेव्हिन्यू विभागाने ८ कोटी, राज्य पोलिसांना ८ कोटी, नार्कोटीस्ट विभाग २ कोटी, राज्य उत्पादन शुल्क १ कोटी, कस्टम विभागाने जवळपास ७२ लाखाची मालमत्ता जप्त केली आहे.

गेल्या चोविस तासात झालेल्या कारवाई या नागपूर, मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यात झाल्या आहेत. निवडणूक यंत्रणा ही दक्ष आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभने दाखवणे कधीही खपवून घेतले जाणार नाही असा संदेश यातून देण्यात आला आहे. शिवाय जी कारवाई करण्यात आली आहे. त्यामागचे धागेदोरे शोधून योग्य कारवाई करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने संबधित यंत्रणाना दिले आहेत. दरम्यान आचारसंहिता भागाचे प्रकार आढळून आल्यास आयोगाच्या सीव्हिजील अॅपवर तक्रार करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. ही माहिती सर्व तपास यंत्रणाना दिली जाईल असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान प्राप्तीकर विभागाचा कक्ष चोवीस तास कार्यरत असणार आहे. त्यामुळे धनशक्तीचा वापर करून मतदारांना प्रलोभवने दाखवणाऱ्या प्रवृत्तींना या माध्यमातून आळा घातला जाणार आहे. हा विभाग आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरू राहाणार आहे. या ठिकाणी असे काही गैरप्रकार आढळल्यास तक्रार दाखल करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्यासाठी १८००२२१५१० हा टोल फ्री क्रमांक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon