अल्पवयींन मुलावर बाल निरीक्षणगृहात अत्याचार; १६ वर्षीय आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

Spread the love

अल्पवयींन मुलावर बाल निरीक्षणगृहात अत्याचार; १६ वर्षीय आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – बालनिरीक्षण गृहात १७ वर्षांच्या मुलावर अत्याचार झाल्याची तक्रार डोंगरी पोलिसांना प्राप्त झाली असून याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी १६ वर्षीय मुलाविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. यावेळी १६ वर्षांच्या मुलाने पीडित मुलाच्या तोंडात पांढऱ्या रंगाची पावडरही कोंबल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली पीडित मुलाला नुकतीच ताब्यात घेण्यात आले होते. डोंगरी येथील बालनिरीक्षण केंद्राच्या शौचालयात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने सोमवारी पीडित मुलाच्या तोंडात १० पेक्षा जास्त गोळ्या अथवा पावडर कोंबून त्यानंतर त्याच्यावर अत्याचार केला आहे. त्यानंतर आरोपीने पीडित मुलावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून डोंगरी पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलाच्या बराकमधील १६ वर्षांच्या मुलाविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याप्रकरणी डोंगरी पोलीस तपास करीत असून लवकरच पीडित मुलाची वैद्यकीय चाचणी करून त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यात येणार आहे. विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी दिल्याप्रकरणी पीडित मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी डोंगरी बालनिरीक्षण केंद्रात करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon