नवी मुंबईत चैन स्नॅचिंगच्या तीन गुन्हयांची उकल करण्यात रबाळे पोलीसांना यश, आरोपी अटकेत

Spread the love

नवी मुंबईत चैन स्नॅचिंगच्या तीन गुन्हयांची उकल करण्यात रबाळे पोलीसांना यश, आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – नवी मुंबई परिसरात अनेक गुन्हे घडत असताना रबाळे पोलिसांनी मात्र गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. अशीच एक घटना घणसोली परिसरात घडली आहे. मनिषा मानसिंग निकम, वय ४० वर्षे, व्यवसाय गृहिणी, राह. घणसोली, नवी मुंबई सदर महिला घणसोली नाल्याच्या ब्रिजवर मॉर्निंग वॉक करून घरी जात असताना एका सफेद रंगाच्या स्कुटी मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या गळयातील १६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून चोरी करून पसार झाले. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रबाळे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा रजि. नं. ५४६/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच याच आरोपींनी पुढे जावून कळवा पोलीस ठाणे, ठाणे शहर हद्दीत अशाच प्रकारे जबरी चोरीचा गुन्हा केला असल्याचे निसपन्न झाले आहे.

चैन स्नाचिंगचे अनेक गुन्हे रबाळे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सदरचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, परि-१ पंकज डहाणे. सहा. पोलीस आयुक्त योगेश गावडे वाशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे पोलीस ठाणेचे १. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उन्मेश थिटे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दिलीप चव्हाण, सपोनि अविनाश पाळदे (गुन्हे प्रकटीकरण) व तपास पथकातील अंमलदार सपोउपनि अरूण पवार, पोहवा प्रसाद वायंगणकर, पोना विजय करंकाळ, राहुल साळुंके,प्रविण भोपी यांनी नमूद गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून तेथील परिस्थितीचा बारकाई अभ्यास केला व योग्य तो तपास सुरू केला. सीसीटीवी फुटेज, तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारामार्फतीने मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर मोटारसायकल वापरणा-या आरोपींच्या अमृतनगर, मुंब्रा परीसरातून मुसक्या आवळल्या.

सदर परीसरात सलग तीन दिवस व रात्र असे वेषांतर करून पायी सापळा लावून तसेच दुचाकीवर गस्त घालीत असताना दिनांक १७/१०/२०२४ रोजी गुन्हयात वापरलेल्या मोटारसायकलवर एक आरोपी मिळून आला. त्याला ताब्यात घेवून त्याचा साथीदार असलेल्या दुस-या आरोपीबाबत माहीती घेवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपीकडून गुन्हयातील मोटारसायकल व दागिणे असा एकूण ०२,९०,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून जबरी चोरीचे एकूण तीन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसिम नर मोहमद शेख, वय ३० वर्षे, धंदा बेकार, राह. रूम नं. २०४, आर्फिन रेसिडेन्सी, आंबेडकर नगर, शंकर मंदिर रोड, मुंब्रा, ठाणे, नोमान ईरफान अहमद शेख, वय २३ वर्षे, धंदा बेकार, राह. रूम नं. २०६, अमिर अपार्टमेंट, तनवरी नगर, मुंब्रा कौसा, ठाणे अशी नावे आहेत

सदर आरोपींवर रबाळे पोलीस स्टेशन गुन्हा रजि. कं. ५४६/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९(४), ३(५),

रबाळे पोलीस स्टेशन गुन्हा रजि. कं. ४३६/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५),

कळवा पोलीस स्टेशन, ठाणे गुन्हा रजि. कं. १३८७/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) असे गुन्हे दाखल आहेत

अटक आरोपींकडून ९०,०००/- रू किं.ची सुमारे १६ ग्रॅम वजनाचे दोन वाट्या व काळे मणी असलेले सोन्याचे तुटलेले मिनी गंठण जु.वा.कि.सु., ६०,०००/- रू किं.ची १२ ग्रॅम वजनाची तुटलेली सौनयाची चेन (रबाळे पो. ठाणे.गु. रजि. ४३६/२४) ३०९४४४2 ४) ९०,०००/- रू. किमंती सुझुकी क ०५४८ सफेद रंग, ५०,०००/- रू.किं.ची ८ ग्रॅम वजनानी तुटलेली सोन्याची चैन (कळवा पो. ठाणे गु.रजि. नं. १३८७/२४ भा.न्या.स. क. मोटारसायकल नं. एम.एच.०४ एलडी आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी रबाळे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon