मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची धक्कदायक आणि महत्त्वाची माहिती

Spread the love

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची धक्कदायक आणि महत्त्वाची माहिती

१५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळालेल्या नंतर ही बाबा सिद्दीकी यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा नव्हती

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेने रविवारी कोर्टातील सुनावणी नंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलिसांनी एक धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती दिली. बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी आली होती, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर येत होती. तसेच बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती, अशी माहिती कालपासून समोर येत आहे. पण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार परिषदेत याबाबत मोठा खुलासा केला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी त्यांना कोणत्याही दर्जाची सुरक्षा नव्हती. तर त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ ३ पोलीस कर्मचारी तैनात होते, असा मोठा खुलासा गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे.

“काल रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हे त्यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर आले तेव्हा त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना निर्मल नगर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या घटनेबाबत निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास तातडीने क्राईम बँचकडे सोपवण्यात आला. ही घटना घडली तेव्हा तातडीने तिथे उपस्थित असलेले निर्मल नगर पोलीस ठाण्याचे एपीआय राजेंद्र दाभाडे आणि त्यांच्या टीमने दोन आरोपींना पकडलं”, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर तात्काळ तिथे उपस्थित असणारे पोलीस अधिकारी एपीआय राजेंद्र दाभाडे आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांनी अतिशय धाडस दाखवत घटनास्थळावरुनच दोन आरोपींना पकडण्यात यश मिळवलं आहे. या दोन्ही आरोपींकडे शस्त्र असण्याची शक्यता असल्याची माहिती असतानासुद्धा स्वत:चा जीव धोक्यात घालून एपीआय दाभाडे आणि त्यांच्या टीमने अतिशय कौतुकास्पद कामगिरी करत त्या दोन आरोपींना तात्काळ पकडलं आहे”, असं पोलीस म्हणाले. घटनास्थळावरुन एक आरोपी पळून गेला आहे. तो तसेच इतर आरोपींचा या प्रकरणात असणारा रोल याबाबत गुन्हे शाखेमार्फत पुढील तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास आम्ही प्रत्येक अँगलने करत आहोत. आम्ही आरोपींकडून दोन पिस्तूल आणि २८ जीवंत काडतुसे जप्त केले आहेत. एका आरोपीची २१ तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळाली आहे. या हत्येच्या घटनेत लॉरेन्स बिश्नोई गँगचा जो रोल आहे, त्याबाबत आम्ही सविस्तर तपास करत आहोत”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

यावेळी पत्रकारांनी पोलिसांना बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती का? असं विचारलं होतं. त्यावर पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांना कॅटेगराईज सुरक्षा नव्हती असं स्पष्ट केलं. “बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस कर्मचारी तैनात होते. हल्ला झाला त्यावेळी एक पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होते”, असं पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. क्राईम ब्रँचकडून १५ टीम बाहेर आहेत. आम्ही प्रत्येक अँगलने तपास करतोय. आम्हाला बाहेरच्या राज्यातील पोलिसांची मदत हवी आहे. ती मदत घेतली जात आहे. टेक्निकल, ग्राऊंड इन्वेस्टीगेशन आणि इतर गोष्टींचा मदत घेऊन आम्ही तपास करत आहोत. लॉरेन्स बिश्नोई किंवा सलमान खान किंवा इतर कुठला अँगल असेल त्या सर्व अँगलने आम्ही तपास करत आहोत”, असं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सांगितलं. तसेच “जी पोस्ट व्हायरल होत आहे ती कितपत खरी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत”, असंही पोलिसांनी सांगितलं. खूप प्राथमिक स्तरावर तपास आहे. जसजशी तथ्य समोर येतील तसतशी माहिती दिली जाईल. तीनही आरोपींचा रेकॉर्ड तपासत आहोत. तिघांची नावे आमच्याकडे पूर्व स्वरुपात आहेत. हे तीनही आरोपी जिथे राहतात त्या भागातील स्थानिक पोलिसांसोबत संपर्क करुन आम्ही तीनही आरोपींचा रेकॉर्ड तपासत आहोत. आरोपींची ओळख पटलेली आहे. त्यांच्या शोधासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon