परभणीच्या शाळेतील स्वछतागृहात बालिकेवर अत्याचार; पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद, आरोपीचा शोध सुरू

Spread the love

परभणीच्या शाळेतील स्वछतागृहात बालिकेवर अत्याचार; पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद, आरोपीचा शोध सुरू

पोलीस महानगर नेटवर्क

परभणी – राज्यात दिवसेंदिवस मुली व महिलांच्या अत्याचारात लक्षणीय वाढ होत आहे.अशीच एक घटना परभणीमध्ये घडली आहे. शहरातील एका इंग्रजी शाळेमध्ये बालवाडीत शिकणाऱ्या एका ५ वर्षीय मुलीवर शाळेतील स्वच्छतागृहात अत्याचार करण्यात आल्याची घटना ५ ऑक्टोबरला घडली होती. या प्रकरणी ७ ऑक्टोबरला सोनपेठ पोलिस ठाण्यात पोक्सो व इतर कलमांखाली आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे. बेलापूर आणि माजलगाव येथे शाळेतच चिमुकलीवर अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर आता शहरात देखील अशीच घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलगी सोनपेठ शहरातील एका इंग्रजी शाळेमध्ये बालवाडीत शिकण्यास आहे. ५ ऑक्टोबरला सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी आली. यावेळी मुलीला सरळ बसता येत नव्हते. आईने चौकशी केल्यावर पीडितेच्या अंगावर ओरखडल्याचे दिसून आले. त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले.

त्यानंतर संबंधित मुलीच्या आईने थेट सोनपेठ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील, पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड आदींनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबंधित घटनेची सत्यता तपासणी करण्यासाठी वेगवेगळे ६ पथक तयार करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon