माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; मृत्यू संशयास्पद, चौकशी सुरु

Spread the love

माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; मृत्यू संशयास्पद, चौकशी सुरु

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – क्रिकेटच्या दुनियेत सचिन तेंडुलकर सोबत डेब्यु करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सलील अंकोलाच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील डेक्कन भागातील गल्ली क्रमांक १४ मध्ये माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आई मृतावस्थेत आढळल्या आहेत. कामवाली बाई शुक्रवारी घरकामासाठी त्यांच्या घरी गेली असता, त्यांचा मृत्यू झाल्याच समोर आलंय. विशेष म्हणजे त्या पुण्यात एकट्या राहात होत्या अशी माहिती आहे. माला अशोक अंकोला असं त्यांचं नाव असून त्या ७७ वर्षांच्या होत्या. या घटनेनंतर स्वत: सलील अंकोला याने इंस्टाग्रामवरुन पोस्ट करुन गुड बाय मॉम असं म्हटलं आहे. त्यामुळे, क्रिकेट विश्वाला हादरवून टाकणारी ही घटना आहे. सलील अंकोला याच्या आईचा मृतदेह अशारितीने घरात आढळल्याने पोलिसांच्या मते हा मृत्यू संशयास्पद मानला जात आहे. त्यामुळे, त्यांच्या मृतेदाहाचे आधी पोस्टमॉर्टम करण्यात येईल, अशी माहिती आहे. दरम्यान, माला अंकोला यांचे पती म्हणजे सलीलचे वडिल हे आयपीएस दर्जाचे पोलीस अधिकारी होते. सलील अंकोला माजी भारतीय क्रिकेटपटू असून १९८९ ते १९९७ या कालावधीत त्याने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. सलीलने भारतासाठी एक कसोटी सामना व २० एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात योगदान दिलं आहे. आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात देखील सलीलने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत केली होती. सध्या सलील अंकोलाचे कुटुंब पुण्यात राहत असून शुक्रवारी त्याच्या आईचा मृतदेह पुण्यातील घरात आढळून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon