विक्रीसाठी आणण्यात आलेल्या तूप व बटर साठ्यावर जप्तीची धडक कारवाई

Spread the love

विक्रीसाठी आणण्यात आलेल्या तूप व बटर साठ्यावर जप्तीची धडक कारवाई

कल्याण – अमूल तूप आणि अमूल बटर चा व्यवसाय करणा-यांवर महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागामार्फत आज धडक कारवाई करण्यात आली. मोमिन अब्दुल मुनाफ हारुन रशिद, रा. निजामपुरा, भिवंडी आणि तौसिफ इकबाल काझी, रा. खडकरोड, तीनबत्ती, भिवंडी हे गफूरडॉन चौक येथे अमूल कंपनी चे तूप व बटर अवैधरित्या विक्री करीता आणणार असल्याची माहिती बाजार परवाना विभागाचे सहा. आयुक्त प्रसाद ठाकुर यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी बाजार व परवाना विभागातील प्रशांत धिवर व अन्य कर्मचारी यांना तपासणी करीता धाडले असता नमूद दोन्ही इसम हे अमूल डेअरी चे तूप व बटर विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे.

हारुन रशीद आणि तौसिफ काझी हे ब्रीझा गाडीतून बटर चे दोन बॉक्स (अंदाजे ३० किलो) व तूपाचे पाच बॉक्स (अंदाजे १२५ किलो) घेऊन येऊन किराणा विक्रेत्यांना पुरवठा करीत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबधिताना परवाना विचारण्यात आला असता ते समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. संबधितांनी कुर्ला येथून अमूल बटर चे बिल सादर केले, मात्र अमुल तूपाच्या बिलाबाबत त्यांना विचारणा केली असता संबधित इसमांनी उपलब्ध नसल्याचे सांगितले.

जप्त करण्यात आलेले वस्तूंची शुध्दता तपासणीसाठी संबंधितांकडील साहित्य (अमुल बटर व अमुल तूप पिशव्या) बाजार व परवाना विभागाने ताब्यात घेतले असून, आवश्यक त्या पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन ठाणे, बाजारपेठ पोलिस स्टेशन, कल्याण यांचेकडे पत्रव्यवहारासह सुपूर्द करण्यात येत आहे.पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon