डेंग्यू आजाराने पत्नीचा मृत्यू, दोन दिवसांनी पतीनेही गळफास घेत संपवलं जीवन; सात महिन्यांच्या चिमुकलीचे छत्र हरपले

Spread the love

डेंग्यू आजाराने पत्नीचा मृत्यू, दोन दिवसांनी पतीनेही गळफास घेत संपवलं जीवन; सात महिन्यांच्या चिमुकलीचे छत्र हरपले

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – पती-पत्नीचं नातं हे अत्यंत जवळचं असतं. त्यांचं एकमेकांवरील प्रेम हे साताजन्माचं असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे जर पती-पत्नीपैकी एक कोणी सोडून गेलं तर दुसऱ्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो. आपल्या जवळच्या व्यक्तीशिवाय कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. अशाच विवंचनेतून पत्नीच्या मृत्यूने खचलेल्या एका पतीने आपलं आयुष्य संवपलं आहे. दोन दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाल्याने नैराश्यात गेलेल्या पतीने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली. ही दुःखद घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे घडली आहे. याबाबत इंदापूर येथील पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनवाडी येथील श्रावणी गोपाळ सुतार – २० यांचे डेंग्यूच्या आजारामुळे शुक्रवारी निधन झाले होते. या दुःखद घटनेतून सावरत असतानाच श्रावणी यांचे पती गोपाळ उर्फ स्वप्नील प्रदीप सुतार – २४ यांनी रविवारी दुपारी घरी कुटुंबीयांशी बोलत होते. तेव्हा मला कंटाळा आला आहे. मी जरा आराम करतो, असं सांगून ते खोलीत गेले. पण, ते पुन्हा बाहेर आलेच नाहीत.

खोलीत घराच्या छताला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. गोपाळ हे बराच वेळ खोलीतून बाहेर आले नाही. तेव्हा घरच्यांनी जाऊन पाहिलं तर गोपाळ यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं दिसून आलं. याबाबतची फिर्याद गोपाळ यांचा भाऊ संतोष सुतार यांनी भिगवण पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह ताब्यात घेतला.या घटनेमुळे श्रावणी आणि गोपाळ यांची ७ महिन्यांची दूर्वा हि चिमुकली पोरकी झाली. गोपाळची भिगवण येथे मोबाईल शॉपीचे दुकान होते. या दुख: द घटनेमुळे भिगवण व मदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon