आरबीआय बँकेच्या इमारतीच्या बंदोबस्तात गैरहजर रहणाऱ्या लोकल आर्म्स दलातील १२ पोलीस शिपाई निलंबित

Spread the love

आरबीआय बँकेच्या इमारतीच्या बंदोबस्तात गैरहजर रहणाऱ्या लोकल आर्म्स दलातील १२ पोलीस शिपाई निलंबित

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – मुंबई पोलिसांच्या लोकल आर्म्स (सशस्त्र पोलीस) दलातील १२ पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. फोर्ट येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन इमारतींवर (जुनी आणि नवीन इमारत) पहारा देणारे मुंबई पोलिसांचे ११ कर्मचारी आणि त्यांच्या कंपनीचे कारकून हे कोणालाही न कळवता कामावर गैरहजर राहिले होते. त्याप्रकरणी ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरबीआय ची सुरक्षा धोक्यात टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांना काम सोपवण्याची जबाबदारी असलेल्या कारकूनालाही शिक्षा देण्यात आली. भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या सुरक्षेला धोका निर्माण करून स्वतःच्या फायद्यासाठी हे गैरवर्तन लपवल्याबद्दल ही शिक्षा ठोठावण्यात आली.पोलीस उपायुक्तांनी १२ पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची पुष्टी केली. मात्र, त्यांनी यासंदर्भात अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. पोलिस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकल आर्म्स दोन विभागाकडे, आरबीआयच्या जुन्या इमारतीत ४८ पोलिस आणि नवीन इमारतीत ३२ कॉन्स्टेबल नियुक्त करण्याची जबाबदारी होती. कॉन्स्टेबल महेंद्र सांगळे हे लोकल आर्म्स दोन मध्ये कंपनी अ चे कंपनी कारकून म्हणून काम करत होते. तर दुसरे पोलीस कर्मचारी कमलेश मोरे हे त्यांचे सहाय्यक म्हणून काम करत होते. इतर पोलिस कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामांचे वाटप करणे आणि रजेचे अर्ज लिखित स्वरूपात घेणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. सांगळे हे १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत रजेवर असल्याने मोरे त्यांचे काम सांभाळत होते. रविवारी त्यांना महत्त्वाच्या आस्थापनांवरील गार्ड ड्युटीचे वाटप करण्यात आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून त्यांच्या वाटप केलेल्या कर्तव्यांवर अहवाल देणे अपेक्षित होते. मात्र, सोमवारी १० पोलिस कर्मचारी हे जुन्या इमारतीत ड्युटीसाठी आलेच नाही तर सेंट्रल बँकेच्या नव्या इमारतीत ४ पोलीस हेही कामावर रुजू झाले नाहीत. हे समोर आल्यावर अखेर आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे चौकशी केली. काही शिपाई गावाला गेल्याचे चौकशीत उघड झाले. अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्या खात्यांतर्गत चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon