पाली-खोपोली महामार्गावर शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Spread the love

पाली-खोपोली महामार्गावर शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू

योगेश पांडे/वार्ताहर 

पाली – पाली खोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. या राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. बुधवारी दुपारी पाली खोपोली राज्य महामार्गावर कानसळ गावाजवळील नेव्ही कॉलेज समोर बाईकची शाळेच्या बसला धडक बसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात बाईकवरील तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये वळणाऱ्या रस्त्यावर नियंत्रण गमावल्यामुळे दुचाकी समोरून येणाऱ्या शाळेच्या बसला धडकली. श्रीराज एज्युकेशन सेंटरची शाळेची बस घोटावडे येथून शाळकरी मुलांना पालीकडे घेऊन जात होती. यावेळी पालीकडून खोपोलीच्या दिशेने वेगाने आलेला बाईकस्वार शाळेच्या बसला जाऊन धडकला. या बाईकवर तिघेजण प्रवास करीत होते. यावेळी स्कूल बसच्या पाठीमागून येणाऱ्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात ही सर्व थरारक घटना कैद झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी आदींसह पोलीस उपस्थित होते. हा अपघात इतका भीषण होता की, धडक देतान बाईकवरील तिघेही हवेत उडाले. या अपघातात मोनेश बालू वाघमारे , नवनाथ वामन जाधव आणि विलास विष्णू घोगरे या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon