विवाहित महिलेचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार; पोलिसांकडून ३० वर्षीय आरोपीला बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
मिरा-भाईंदर – एका विवाहित महिलेचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना भाईंदर मध्ये समोर आली आहे. पीडित महिलेच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत, आरोपी इसमाकडून हे कृत्य करण्यात आले आहे. या प्रकरणी ३० वर्षीय आरोपीला भाईंदर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भाईंदर पश्चिमेच्या एका परिसरात ३२ वर्षीय पीडित महिला तिच्या कुटुंबीयांसह राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचे पती मजुरीचे काम करतात, त्यातूनच संपूर्ण कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करतात. शनिवारी रात्री पीडितेचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी जवळच्याच परिसरात राहणारा गौतम किणी हा रात्री ११ वाजताच्या सुमारास पोडितेच्या घरात शिरला. यावेळी प्रथम त्याने पिढीतेचे तोंड व हातपाय बांधले .तसेच आरडाओरड केल्यास ठार मारून टाकण्याची धमकी दिली. यानंतर पोडितेवर बळजबरीने मध्यरात्रीपर्यंत बलात्कार केला. ह्याची तक्रार घाबरलेल्या पोडितेने मंगळवारी भाईंदर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून भाईंदर पोलिसांनी आरोपी गौतमला बुधवारी दुपारी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पीडित व आरोपी एकमेकांना परिचित नसल्याची माहिती भाईंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.