नाशिकनंतर धुळ्यात खळबळ; एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह दोन मुलांची आत्महत्या
योगेश पांडे/वार्ताहर
धुळे – नाशिकमध्ये काल एक हृदयद्रावक घटना समोर आली. नाशिकमधल्या पाथर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये आई, वडील आणि मुलीने सोबत आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनं अख्ख्या नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोवर धुळे जिल्ह्यातून देखील अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील गिरासे कुंटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. धुळ्यातील गिरासे कुटुंबातील दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी भागातील ही घटना आहे. मुलाच्या अडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं शेजारच्यांना खोटं सांगितलं असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे आणि मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असं मृतांची नावं आहेत. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. धुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.