ठाण्यात ‘मिर्जापूर’; आईवरून शिवी दिली म्हणून आरोपीने मुंडकं छाटून केली हत्या
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – ठाण्याच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये झालेल्या ३५ वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोनच दिवसांपूर्वी ठाण्यात इमारतीच्या टेरेसवर मुंडकं छाटलेला मृतदेह आढळला होता, त्यामुळे एकच खळबळ माजली होती. आईवरून शिवी दिली म्हणून आरोपीने मुंडकं छाटून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सुपरवायजर असलेल्या ३५ वर्षांच्या सोमनाथ सातगिरे यांची आरोपी प्रशांत कदमने हत्या केली. हत्येनंतर प्रशांतने सोमनाथ यांचा मृतदेहाचं मुंडकं छाटलं आणि टेरेसवर ठेवलं. सोमनाथ यांनी प्रशांतला आईवरून शिवी दिली होती. याचा राग मनात धरून प्रशांतने हत्येचा कट रचला. क्राईम सीरिजमध्ये कशी हत्या केली जाते, तसंच कुठून हत्यार आणलं जातं, त्या ठिकाणावरून हत्यार आणून प्रशांतने सुपरवायजर सोमनाथची हत्या केली. सुपरवायजर असलेल्या सोमनाथची प्रशांतने कामावर असताना त्याची हत्या केली होती. सोमनाथ हा सोसायटीचा मुख्य सुरक्षा अधिकारी होता.