अनंत चतुर्दशीचे औचीत्य साधुन पालघर पोलीसांचा हेल्मेट वाटपाचा अनोखा उपक्रम
प्रमोद तिवारी
पालघर – बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतुन नव्याने सुरु झालेल्या वाहतुक शाखेमार्फतीने वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन होणेकरीता वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे संकल्पनेतुन संपुर्ण पालघर जिल्हयात सुरू असलेल्या जनसंवाद अभियान अंर्तगत “रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम” राबविण्यात येत असुन त्याअंतर्गत अनंत चतुर्दशीचे औचीत्य साधुन हेल्मेट वाटपाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या असुन संपुर्ण समाजात वाहतुक नियमांची जनजागृती व्हावी व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा रोजचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी दुचाकी चालवितांना हेल्मेट किती आवश्यक आहे असा मोलाचा संदेश देण्याकरीता दिनांक १७/०९/२०२४ रोजी अनंत चतुर्दशी औचित्य साधुन मंडळाच्या १० दिवसाचे गणेश मुर्ती विसर्जनाचे वेळी गणेश भक्तांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात येऊन पालघर जिल्हा पोलीस व जिल्हा वाहतुक शाखेकडुन एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. दि. १७/०९/२०२४ रोजी अनंत चतुर्दशी दिवशी पाालघर जिल्हयातील बोईसर पोलीस ठाण्याचे हद्दीतील नवापुर नाका येथे गणेश भक्तांना बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या हस्ते एकुण ५०० हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी हेल्मेटचा नेहमी वापर करावा असे आवाहन करण्यात येवून वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.
सदरचा कार्यक्रम बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे संकल्पना व मार्गदर्शनाखाली विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर, संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर, विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, प्रभारी अधिकारी, बोईसर पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे, प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतुक शाखा पालघर, पोउपनि संदीप नागरे तसेच पालघर जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार सफौ खैरनार, नरेश धोडी, विनोद धोडी, पोहवा मनिष संखे, पोना सोनकांबळे, पोशि कुलाल, बो-हाडे यांनी सहभागी होऊन सदरचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.