पुण्यातील कुख्यात गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाकडून कारवाई

Spread the love

पुण्यातील कुख्यात गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाकडून कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुण्यात एका खतरनाक आरोपीला अटक करण्यात आली आहे. खून व ४ गुन्हे दाखल असलेल्या गुंडाकडून खंडणी विरोधी पथकाने एक पिस्टल आणि एक जिवंत राऊंड जप्त केले आहे. ऋतिक कैलास एखंडे (वय २३, रा. एरंडवणा,पुणे)असे या गुंडाचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे, मयूर भोकरे यांना पाहिजे असलेला आरोपी ऋतिक एखंडे हा कर्वेनगरमधील सहवास कॉर्नर येथे येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा एक पिस्टल व एक जिवंत राऊंड घरात ठेवला असल्याचे सांगितले. २५ हजार १०० रुपयांचा माल घरातून जप्त करण्यात आला.

ऋतिक एखंडे याच्यावर २०१७ मध्ये कोथरुड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. उत्तमनगरमध्ये २०२१ मध्ये खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. डेक्कन आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टचा गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत. सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, खंडणी विरोधी पथकाचे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, अभिजित पाटील, सहायक पोलीस फौजदार प्रवीण धमाळ, पोलीस हवालदार सयाजी चव्हाण, रवींद्र फुलपगारे, अमोल आवाड, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, प्रफुल्ल चव्हाण, राजेंद्र लांडगे, मयूर भोकरे, अमर पवार, गीतांजली जांभुळकर, अंकुश भिसे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon