धक्कादायक! नागपूर पोलिसांचा पोलीस चौकीत जुगार खेळताना वीडियो वायरल

Spread the love

धक्कादायक! नागपूर पोलिसांचा पोलीस चौकीत जुगार खेळताना वीडियो वायरल

पोलीस ठाण्यात जुगाराचा डाव; वर्दीवरील पोलिसांचे धुम्रपान, याप्रकरणी अद्याप कारवाई नाही

योगेश पांडे / वार्ताहर 

नागपुर – पोलिसांवर राज्याच्या जनतेची सुरक्षेची जबाबदारी असते. जनतेचे मित्र पोलीस असल्याचे सांगितले जाते. परंतु सर्वसामान्य व्यक्ती पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरतो. कारण त्या ठिकाणी सर्वसामान्यांना नाही तर नेते अन् दादांचा सन्मान होत असतो. आता त्यापेक्षा धक्कादायक बाब एका व्हिडिओतून समोर आली आहे. ज्या पोलिसांवर गुन्हे रोखण्याची जबाबदारी आहे, तेच पोलीस ठाण्यात बसून राजरोसपणे गुन्हे करत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमधील या व्हिडिओत काही पोलीस कर्मचारी पोलीस चौकीत जुगार खेळताना दिसत आहेत. वर्दीवर असलेले हे पोलीस कर्मचारी धूम्रपान करताना व्हिडिओत दिसत आहे. या पोलिसांना कोणत्याही अधिकाऱ्यांची भीती राहिली नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात असा प्रकार करताना त्यांना काहीच वाटले नाही. पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका तक्रारदाराने हे दृश्य त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीत केले. त्यानंतर तो व्हिडिओ समाजमाध्यमाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया त्यातून उमटत आहे. अजूनपर्यंत या व्हिडिओची दखल घेऊन काहीच चौकशी किंवा कारवाई झालेली नाही. नागपुरात राजरोसपणे गंभीर गुन्हे घडत आहे. परंतु कायदा सुव्यवस्थेची जबबदारी असणारे पोलीसच कायदा मोडत आहे. या पोलीस दलाकडून नागरिकांना सुरक्षित वातावरण कसे मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे. पोलीस पोलीस चौकीत बसून जुगार खेळायला लागले तर कायदा सुव्यवस्थेचा काय होणार? असा प्रश्न या व्हिडिओसमोर आल्यानंतर निर्माण झाला आहे. आता या प्रकरणाची चौकशी होणार का? इतरांना दहशत बसेल अशी कारवाई होणार का? हे प्रश्न निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon