रेल्वे प्रवासात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या महिलेला पोलीसांनी ठोकल्या बेड्या, कल्याण ते सीएसटी दरम्यान घटना

Spread the love

रेल्वे प्रवासात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या महिलेला पोलीसांनी ठोकल्या बेड्या, कल्याण ते सीएसटी दरम्यान घटना

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – लोकलने मुंबईहून ती ठाण्याच्या दिशेने प्रवास करत होती. ध्यानीमनी नसताना चुकून तिच्या हाताला एक सोन्याची चैन लागली. गर्दीत ऐवढ्या सहजपणे चोरी करता येते. हीबाब किती सोपी आहे हे तिला पटले. त्यातून पैसेही चांगले मिळतात. त्यामुळे एक चुक पुढे तिची सवय बनून गेली. एकामागोमाग एक चोऱ्या ती करू लागली. जसा काय तिचा तो व्यावसाय होवून बसला. परिस्थिती अशी झाली की कल्याण सीएसएमटी दरम्यान चोरीच्या घटना वाढल्या, आणि ती पोलिसांच्या रडारवर आली. गेल्या जानेवारी महिन्यापासून लोकल ट्रेनमध्ये महिलांचे दागिने चोरी होण्याची घटना वाढल्या होत्या. एकीकडे कुर्ला, ठाणे, दादर जीआरपी या प्रकरणात आरोपीचा शोध घेत होते. तर दुसरीकडे रेल्वे क्राईम ब्रांच देखील आरोपींच्या शोधात होते. रेल्वे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार या चोरट्यांच्या शोधाकरीता पोलिसांनी मोहिम तीव्र केली. कल्याणध्ये एक महिला दररोज फलाटावर फिरायची. ज्या ठीकाणी महिलांची गर्दी होते, त्याठिकाणी फिरून रेकी करायची. रेल्वे क्राईम ब्रांच युनिट दोनचे अधिकारी या महिलेवर नजर ठेवून होते.

अखेर एक दिवस ती पकडली गेली. रेल्वे क्राईम ब्रांच युनीट दोनच्या पोलिसांनी या महिलेची चौकशी सुरु केली. रोशनी मोरे या महिलेचे नाव आहे. तीने कबूली दिली की आत्ता पर्यंत तिने अनेक महिलांचे दागिने लांबविले आहे. आत्तापर्यंत तिच्याकडून सहा महागडे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या बाबत क्राईम ब्रांचचे अधिकारी अरशद शेख यांनी सांगितले की, रोशनीचे पती प्लंबरचे काम करतात. ती नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहते. जानेवारी महिन्यात मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येताना एका प्रवासी महिलेची चैन तिच्या हाती लागली. गर्दीत चोरी करणे सोपे आहे. हे समजल्यावर तीने चोरी करण्यास सुरुवात केली. एक महीन्यापासून तिच्यावर पोलिस नजर ठेवून होते. सीसीटीव्हीत ती दिसून येत असल्याने तिला ताब्यात घेतल्यावर तिने चोरीची कबूली दिली. रोशनी मोरे ही नवी मुंबईच्या कोपखैरणेची राहाणारी आहे. तिचा नवरा प्लंबर आहे. तिचं वय ३० वर्षे आहे. एक दिवस ती मुंबईहून ठाण्याच्या दिशेने लोकलने प्रवास करत होती. गर्दीत एका महिलेचे महागडे मंगळसूत्र तिच्या हाती लागले. चोरी करणे इतके सोपे आहे. याचा विचार येताच तिने ट्रेनमध्ये चोरी सुरु केली. सीएसटी ते कल्याण प्रवास दरम्यान या चोरट्या महिलेने अनेक महिलांचे दागिने लांबवले. मात्र कल्याण रेल्वे स्थानकात सीसीटीव्हीत ती एकदा दिसली. पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. तिच्याकडून सहा महागडे दागिने रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी हस्तगत केले आहेत. शॉर्टकट मध्ये इतके पैसे मिळतात. त्यामुळे तिने चोरी सुरु केली होती. तिने अजून काही चोऱ्या केल्या आहेत का याचा ही तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon